मुंबई: भारताने कॉमनवेल्थ गेम्सच्या(commonwealth games) इतिहासात पहिल्यांदा सौरव घोषालने(sourav ghoshal) स्क्वॉशच्या सिंगल इव्हेंटमध्ये(squash single event) कांस्यपदक(bronze medal) आपल्या नावे केले. सौरव घोषाल भारताचा सुपरस्टार भारतीय स्क्वॉश खेळाडू आहे. त्याने सिंगल्मध्ये कांस्यपदकाची कमाई केली. जिंकल्यानंतर सौरव घोषाल खूप भावूक झाला आणि त्याला आपले अश्रू रोखता आले नाही.sourav ghoshal gets emotional after winnig bronze medal in squash singles event
अधिक वाचा - डोंबिवलीतील 'त्या' महिलेविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल
सौरव घोषालने कांस्यपदकाच्या लढतीत इंग्लंडच्या जेम्स विल्सट्रॉपला सरळ ३-० अशा गेम्समध्ये हरवले. सामन्याच्या सुरूवातीपासूनच त्याचा सामन्यावर दबदबा होता आणि त्याने प्रतिस्पर्धी खेळाडूला अजिबात संधी दिली नाही. जगात १५व्या स्थानावरील खेळाडू घोषालने यजमन देशाच्या जगातील २४व्या नंबरच्या खेळाडूविरुद्ध ११-६, ११-१, ११-४ असे सहज हरवले आणि कांस्यपदक आपल्या नावे केले. कॉमनवेल्थ गेम्सच्या सिंगल इव्हेंटमध्ये स्क्वॉशमधील हे पहिले मेडल आहे. यानंतर मात्र सौरव घोषाल भावूक झाला.
History Created. 🇮🇳 This is India's first-ever CWG medal in Squash singles. — ɅMɅN DUВΞY (@imAmanDubey) August 3, 2022
What a moment Saurav Ghosal 👏
He win a Bronze Medal in men's singles squash. #SauravGhosal #Squash pic.twitter.com/aTZq1RVO7a
२०१८मध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट स्पर्धेत सौरव घोषालने दीपिका पल्लीकलसोबत मिळून मिक्स इव्हेंटमध्ये रौप्यपदक पटकावले होते. सौरव २०१०पासून कॉमनवेल्थ गेम्समध्ये भाग घेत आहे. २०१४मध्ये तो छोट्याशा फरकाने मेडल जिंकण्यापासून वंचित राहिला होता. यानंतर २०१८मध्ये तो टॉप ३१मधून बाहेर झाला होता. मात्र सध्याच्या कॉमनवेस्थ गेम्समध्ये भारताची मेहनत फळाला आली. त्याने मेडलवर कब्जा केला. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्सच्या सरावासाठी तो आपल्या कुटुंबापासून दूर होता. सौरवला कॉमनवेल्थ गेम्समध्ये दीर्घकाळानंतर मेडल भेटले होते. याच कारणामुळे त्याच्या डोळ्यात पाणी तरळले.
अधिक वाचा- धनुष्यबाणाबाबत निकालापर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका: कोर्ट
सौरव घोषालचा जन्म १९८६मध्ये पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये झाला. तो आपल्या करिअरमध्ये स्क्वॉशच्या जगात रँकिंगमध्ये १०व्या स्थानावर पोहोचला होता. एशियन गेम्समध्ये सौरव घोषालने एक गोल्ड, एक सिल्व्हर आणि ५ कांस्य पदक आपल्या नावे केली.