मुंबई: भारत आणि द. आफ्रिका(india vs south africa) यांच्यात पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरला सुरू होत आहे. या कसोटीसाठी दोन्ही संघ आपापली रणनीती बनवत आहेत. द. आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने(dean elgar) टीम इंडियाचा सीनियर स्पिनर रवीचंद्रन अश्विनबाबत(r ashwin) मोठे विधान केले आहे. एल्गरने म्हटले की रवीचंद्रन अ्विन भारतीय पिचवर तर चांगली कामगिरी करतो मात्र तो द. आफ्रिकेच्या पिचवर पूर्णपणे फेल आहे जी आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. south Africa captain dean Elgar big statement about Ravichandran Ashwin
आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर म्हणाला, माझ्या हिशेबाने रवी अश्विन द. आफ्रिकेत आतापर्यंत तितका यशस्वी ठरलेला नाही जी आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. सोबतच त्याने भारतात घेतलेल्या विकेटशी येथील तुलना करणे योग्य नाही. आम्हाला संपूर्ण संघाविरोधात एका रणनीतीवर विचार कराया आहे ना केवळ एका खेळाडूबाबत रणनीती तयार करायची आहे.
भारताच्या या ऑफ स्पिनरने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत शानदार कामगिरी केली होती. या कामगिरीबद्दल डीन एल्गरने त्याचे कौतुकही केले.. एल्गर म्हणाला. भारतीय संघ खूप चांगला आहे. रवी अश्विन भारतासाठी महान स्पिनर्सपैकी एक आहे आणि तो शानदार गोलंदाजीही कत आहे. आमच्यासाठी त्याच्याविरुद्ध खेळणे नक्कीच आव्हानात्मक असेल. रवी अश्विन द. आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या ३ सोटी मालिकेत कपिल देवचा ४३४ धावांचा रेकॉर्ड मोडण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.
ऑलराऊंडर रवींद्र जडेजाच्या अनुपस्थितीत रवी अश्विनवर संघाच्या स्पिन गोलंदाजीची मदार असेल. अश्विनने द. आफ्रिकेत ३ कसोटी सामने खेळले आहत. यात त्याच्या नावावर ७ विकेट आहेत. द. आफ्रिकेच्या विकेटवर स्पिनर्सनी विकेट घेणे तितके सोपे नसते. दरम्यान नुकत्याच झालेल्या दमदार प्रदर्शनानंतर अश्विनकडून आफ्रिकेतही आपला रेकॉर्ड चांगला करण्याची अपेक्षा असेल.
दरम्यान, पहिल्या कसोटीआधी द. आफ्रिकेला मोठा झटका बसला आहे. वेगवान गोलंदाज एनरिक नोर्खे दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून बाहेर गेला आहे. एनरिक नोर्खेने एक वेगवान गोलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली होती. या मालिकेत त्याची कमतरता नक्कीच भासेल.