मुंबई: टीम इंडिया(team india) आणि दक्षिण आफ्रिका(south africa) यांच्यातील ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेला(t-20 series) ९ जूनपासून सुरूवात होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघातील खेळाडू जोरदार तयारी करत आहेत. यातच आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने(temba bavuma) मोठे विधान केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टीम इंडियाच्या एका घातक वेगवान गोलंदाजाच्या वेगाने घाबरला आहे. south africa captain temba bavuma is scared with indian bowler umran malik
अधिक वाचा - ... म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड फूड सेफ्टी डे
दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी खूप मजबूत आहे. मात्र टीम इंडियाकडे असा एक घातक गोलंदाज आहे ज्याची दहशत मालिका सुरू होण्याआधीच आफ्रिकेच्या संघात पसरली आहे. या गोलंदाजाची कर्णधार टेम्बा बावुमालाही भीती वाटत आहे. हा घातक गोलंदाज दुसरा तिसरा कोणी नसून उमराम मलिक आहे. त्याच्या वेगाने आयपीएलमध्ये अनेक फलंदाजांना घाम सुटला होता.
आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाने मीडियाशी बोलताना सांगितले, टीम इंडियामध्ये उमरानसारखा गोलंदाज असणे ही खरंच चांगली बाब आहे. कोणताही फलंदाज अशा गोलंदाजाचा सामना करू इच्छिणार नाही जो 150kmphपेक्षा अधिक वेगाने गोलंदाजी करत असेल. तो टीम इंडियासाठी जमेची बाजू आहे. मात्र मला वाटत नाही की कोणताही फलंदाज १५० किमी प्रति तासाच्या वेगाने बॉलचा सामना करणे पसंत करेल.
अधिक वाचा - नवविवाहित तरुणाने व्हायग्राचा घेतला ओवरडोस, बायको गेली सोडून
उमरान मलिक (Umran Malik)ने आयपीएल २०२२मध्ये आपल्या घातक गोलंदाजीने अनेक मोठमोठ्या फलंदाजांचा खेळ बिघडवला होता. त्याने या हंगामात 157 KMPH च्या वेगाने बॉल टाकत साऱ्यांनाच हैराण केले होते. उमरान मलिक सलग १५० किमीप्रति तासाच्या वेगाने गोलंदाजी करतो. त्यांच्या या वेगाने आफ्रिकेच्या गोटात भीतीचे वातावरण आहे.