IND vs SA: एकाच पराभवाने चवताळळा आफ्रिकेचा कर्णधार

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 15, 2022 | 20:37 IST | टाइम्स नाऊ मराठी

IND vs SA: दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दबावात आली मात्र टेम्बा बावुमाचे म्हणणे आहे की पाच सामन्यांच्या मालिकेत केवळ एका पराभवाने रणनीती बदलणे मूर्खपणाचे ठरेल. 

india vs south africa
IND vs SA: एकाच पराभवाने चवताळळा आफ्रिकेचा कर्णधार 
थोडं पण कामाचं
  • टेम्बा बावुमाचे म्हणणे आहे की पाच सामन्यांच्या मालिकेत केवळ एका पराभवामुळे आपल्या रणनीतीमध्ये बदल करणे हे मूर्खपणाचे ठरेल
  • जिंकण्यासाठी १८० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या द. आफ्रिकेची सुरूवात धीमी झाली
  • मात्र बावुमा म्हणाला, एक टीम म्हणून आमची हीच रणनीती आहे. 

मुंबई: दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी(south africa batting) भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दबावात आली होती. मात्र कर्णधार टेम्बा बावुमाचे(temba bavuma) म्हणणे आहे की पाच सामन्यांच्या मालिकेत केवळ एका पराभवामुळे आपल्या रणनीतीमध्ये बदल करणे हे मूर्खपणाचे ठरेल. जिंकण्यासाठी १८० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या द. आफ्रिकेची सुरूवात धीमी झाली यामुळे पहिल्या तीन ओव्हरमध्ये त्यांना केवळ १५ धावाच करता आल्या. मात्र बावुमा म्हणाला, एक टीम म्हणून आमची हीच रणनीती आहे. south africa captain temba bavuma take a dig on batsman

अधिक वाचा -  Uric Acid चा त्रास असलेल्यांसाठी विषासमान असलेले १० पदार्थ

नाही करणार कोणताही बदल

भारताकडून ४८ धावांनी पराभव झाल्यानंतर बावुमा सामन्यानंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाला, पहिले दोन ओव्हर आम्ही नेहमीच पाहतो आणि त्यानंतर डावात लय आणण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर आपल्या मोठ्या खेळाडूंसाठी तयार करतोय. हीच रणनीती आमच्यासाठी कारगिरी ठरली आहे. एका पराभवानंतर या रणनीतीमध्ये बदल करणे हे मूर्खपणाचे ठरेल. 

या कारणामुळे झाला पराभव

बावुमा म्हणाला, मला वाटते की त्यांच्या स्पिनर्सनी आमच्यावर दबाव टाकला. आम्ही दबावातून बाहेर येऊ शकलो नाही. गेल्या दोन सामन्यांत आम्ही जसे केले होते तसे करू शकलो नाही. परिस्थिती त्यांच्या स्पिनर्ससाठी अनुकूल होती. परिस्थिती आपल्या बाजूला झुकवण्यासाठी केलेल्या स्पिनर्सच्या प्रयत्नांचे खरंच कौतुक. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. त्यांच्या कर्णधाराने सामन्याच्या सुरूवातीलाच स्पिनर्सना गोलंदाजी करायला दिली आणि त्यामुळे मला वाटते की मोठे अंतर निर्माण झाले. 

अधिक वाचा - ICC T20 रॅंकिंगच्या टॉप-10 मध्ये ईशान किशनची झेप

फलंदाजांची खराब कामगिरी

बावुमा म्हणाला, फलंदाजीमध्ये आमची कोणतीही चांगली भागीदारी होऊ शकली नाही. कोणीच लय पकडू शकला नाही. पहिल्या दोन सामन्यांत आम्ही चांगली फलंदाजी केली होती मात्र आज फलंदाजांसाठी चांगला दिवस नव्हता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी