IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला डबल झटका, एक खेळाडू मालिकेतून बाहेर, दुसरा बाहेर होण्याचा धोका

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 16, 2022 | 20:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडेन मार्करम भारताविरुद्ध टी-२० मालिकेतून बाहेर गेला आहे. क्विंटन डी कॉकवरही बाहेर होण्याचा धोका आहे. 

markaram
IND vs SA: दक्षिण आफ्रिकेला डबल झटका 
थोडं पण कामाचं
  • एडेन मार्करम भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर
  • कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतक तीन सामने खेळू शकला नाही, आता शक्य नाही बाकी सामने खेळणे
  • क्विंटन डी कॉकवरही धोक्याची टांगती तलवार

मुंबई: भारताविरुद्ध टी-२० मालिकेत २-१ने आघाडीवर असलेला पाहुण संघ द. आफ्रिकेला(south africa) डबल झटका बसला आहे. मालिकेच्या सुरूवातीलाच कोरोना पॉझिटिव्ह(corona positive) आढळलेला फलंदाज एडेन मार्करम(aiden markram) मालिकेतील उरलेल्या दोन सामन्यांतून बाहेर झाला आहे. तर दुसरीकडे धाकड विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक मालिकेतून बाहेर जाण्याचा धोका आहे. south africa cricketer aiden markram ruled out from india vs south africa t-20 series

अधिक वाचा - मुंबईत महिलेने गरीबाला ब्रेडसह चूकून दिले सोन्याचे दागिने...

पहिल्या सामन्याआधी आढळला होता कोरोना पॉझिटिव्ह

एडेन मार्करन बुधवारी अधिकृतपणे भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतून बाहेर झाला आहे. दिल्लीत खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्याआधी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता आणि त्यामुळे त्याला सुरूवातीचे तीन सामने खेळता आले नाहीत. मात्र त्याचा आयसोलेशन पीरियज संपंल्यानंतर मालिकेसाठी मैदानात उतरण्याची शक्यता संपली आहे.

मार्करम नाही खेळणार उरलेले सामने

दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने मार्करम मालिकेतून बाहेर जाण्याबाबत विधान जाहीर करताना सांगितले, आफ्रिकेचा फलंदाज एडेन मार्करमने कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर क्वारंटाईनचे सात दिवस पूर्ण केले आहेत. मात्र तो मालिकेतील इतर उरलेले दोन सामन्यांसाठी मैदानावर पुनरागमन करू शकणार नाही. 

डीकॉकच्या दुखापतीत सुधारणा

बोर्डान क्विंटन डी कॉकच्या दुखापतीबाबतही अपडेट जाहीर केले आहे. विकेटकीपर फलंदाज क्वींटन डी कॉकच्या मनगटाला दुखापतीत सुधारणा झाली आहे. संघाचे मेडिकल स्टाफ त्याच्या दुखापतीवर सातत्याने नजर ठेवून आहेत. काही काळानंतर त्याच्या चौथ्या टी-२० सामन्यांत उपलब्ध असण्याबाबतचा निर्णय त्याच्या दुखापतीतील सुधारणा पाहून ठरवला जाईल. 

अधिक वाचा - राजभवनासमोर आंदोलन करणारे मंत्री पोलिसांच्या ताब्यात

डबल झटका पाहुण्या संघासाठी समस्या उभी करणार

क्विंटन डी कॉक मालिकेतील दुसऱ्या सामन्यापासून बाहेर आहे. तो कट्टकआणि विशाखापट्टणममध्ये खेळवण्यात आलेल्या दोन सामन्यांमध्ये मनगटाच्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या जागी हेनरिक क्लासेनला संधी मिळाली. क्लासेनने कट्टकमध्ये धमाकेदार खेळी करत डिकॉकची कमतरता भरून काढली. मात्र विशाखापट्टणममध्ये आफ्रिकेच्या पराभवानंतर डीकॉकची कमतरता भासली. आता जर तो मालिकेतून बाहेर गेल्यास पाहुण्या संघासमोर मोठी समस्या उभी राहू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी