Cricket : India's South Africa Tour द. आफ्रिकेत क्रिकेटपटूंना कोरोना, भारताचा दौरा संकटात

India's tour in danger कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा सुधारित अवतार सक्रीय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत स्थानिक क्रिकेट स्पर्धा सुरू असताना काही क्रिकेटपटूंना ओमायक्रॉनची बाधा झाली.

South Africa postponed few domestic matches due to omicron, India's tour in danger
द. आफ्रिकेत क्रिकेटपटूंना कोरोना, भारताचा दौरा संकटात 
थोडं पण कामाचं
  • द. आफ्रिकेत क्रिकेटपटूंना कोरोना, भारताचा दौरा संकटात
  • भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी बीसीसीआयने अधिकृतरित्या अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही
  • ओमायक्रॉनमुळे भारतीय क्रिकेट संघाचा दौरा अडचणीत सापडण्याची शक्यता

South Africa postponed few domestic matches due to omicron, India's tour in danger मुंबईः कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन हा सुधारित अवतार सक्रीय झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत स्थानिक क्रिकेट स्पर्धा सुरू असताना काही क्रिकेटपटूंना ओमायक्रॉनची बाधा झाली. यानंतर दक्षिण आफ्रिकेने सर्व देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांना स्थगित केले आहे. 

ओमायक्रॉन संकटाची सुरुवात दक्षिण आफ्रिकेतून झाली आहे. याच दक्षिण आफ्रिकेत भारत आणि दक्षिण आप्रिका यांच्यातील पहिला सामना १७ डिसेंबर २०२१ रोजी होणार आहे. पण ओमायक्रॉन संकटाची तीव्रता बघता, भारताचा दौरा रद्द होण्याची अथवा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाचे अधिकारी परस्पर चर्चेतून लवकरच अंतिम निर्णय जाहीर करतील.

बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंना आरोग्यविषयक काळजी घेण्यास सांगितले आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याविषयी बीसीसीआयने अधिकृतरित्या अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही. पण ओमायक्रॉनमुळे भारतीय क्रिकेट संघाचा दौरा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

भारताचा नियोजीत दक्षिण आफ्रिका दौरा

पहिली कसोटी- १७ ते २१ डिसेंबर, जोहान्सबर्ग
दुसरी कसोटी- २६ ते ३० डिसेंबर, सेंच्युरियन
तिसरी कसोटी- ३ ते ७ जानेवारी, केपटाउन

पहिली वनडे-११ जानेवारी, पर्ल
दुसरी वनडे- १४ जानेवारी, केपटाउन
तिसरी वनडे- १६ जानेवारी, केपटाउन

पहिली टी-२०- १९ जानेवारी, केपटाउन
दुसरी टी-२०- २१ जानेवारी, केपटाउन
तिसरी टी-२०- २३ जानेवारी, पर्ल
चौथी टी-२०- २६ जानेवारी, पर्ल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी