IND vs SA T20: भारताविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघाची घोषणा; या आक्रमक खेळाडूचे पुनरागमन  

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 17, 2022 | 15:35 IST | टाइम्स नाऊ मराठी

South African squad for T20I series against India । आयपीएल २०२२ च्या सत्रानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. कारण जूनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका होणार आहे.

south Africa squad for T20 series against India announced
भारताविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघाची घोषणा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • IPL नंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे.
  • जूनमध्ये आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर असणार आहे.
  • भारताविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे.

South African squad for T20I series against India । मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या सत्रानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ पाहायला मिळणार आहे. कारण जूनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका होणार आहे. दरम्यान दोन्ही देशांमध्ये पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेने आपल्या टी-२० संघाची घोषणा केली आहे. आफ्रिकेच्या संघात आक्रमक खेळाडूचे पुनरागमन झाले आहे. (south Africa squad for T20 series against India announced). 

अधिक वाचा : पार्टीत कंगना झाली या व्यक्तीवर फिदा, सर्वांसमोरच केला किस

दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा

दक्षिण आफ्रिकेचा संघ जूनमध्ये भारताचा दौरा करेल आणि याच दौऱ्यामध्ये पाच टी-२० सामन्यांचे आयोजन केले जाणार आहे. लक्षणीय बाब म्हणजे याच वर्षी टी-२० विश्वचषकाचे देखील आयोजन केले जाणार आहे त्यामुळे आगामी प्रत्येक टी-२० मालिकेकडे क्रिकेट वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मंगळवारी क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (CSA) भारताविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी आपल्या संघाची घोषणा केली. 

दरम्यान, या आफ्रिकेच्या संघामध्ये दक्षिण आफ्रिकेच्या देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ट्रिस्टन स्टब्सला जागा मिळाली आहे. आगामी मालिकेतून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये डेब्यू करेल. याशिवाय संघात जवळपास ७ महिन्यांनंतर जगातील सर्वात वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या ॲनरिक नॉर्कियानेही पुनरागमन केले आहे. गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात शेवटचा दिसलेला ॲनरिक नॉर्किया आता पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याचा वेग सध्याच्या आयपीएल हंगामातही पाहायला मिळत आहे. 

भारताविरूद्धच्या टी-२० मालिकेसाठी आफ्रिकेच्या संघाची घोषणा

टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डिकॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, ॲडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, मार्को येनसेन, तबरेझ स्टेब्सी, ट्रिबेझ स्टेब्स आणि रेसिसन स्टब्स वेन डर ड्यूसेन.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी