IND vs SA: भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकन टीमची घोषणा

South Africa tour India: दक्षिण आफ्रिकन टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत दौऱ्यासाठी क्रिकेट साऊथ आफ्रिका (सीएसए) ने दक्षिण आफ्रिकन टीमची घोषणा केली आहे.

India vs South Africa
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (फोटौ सौजन्य: AP, File Photo)  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • क्रिकेट साऊथ आफ्रिकाने केली दक्षिण आफ्रिकन टीमची घोषणा
  • सप्टेंबरमध्ये सुरू होणार दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
  • दक्षिण आफ्रिकन टीममध्ये तीन नव्या प्लेअर्सला दिली संधी

जोहान्सबर्ग: क्रिकेट साऊथ आफ्रिका (सीएसए) ने दक्षिण आफ्रिकन टीमच्या आगामी भारत दौऱ्यासाठी टीमची घोषणा केली आहे. सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकन टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यामध्ये टी-20 सीरिज आणि टेस्ट सीरिज होणार आहेत. टी-20 सीरिजमध्ये तीन मॅचेस आणि टेस्ट सीरिजमध्ये सुद्धा तीन मॅचेस होणार आहेत. दक्षिण आफ्रिकेने आपल्या टेस्ट टीममध्ये तीन नव्या (अनकॅप्ड) प्लेअर्सला संधी दिली आहे. तर टी-20 क्रिकेट टीममध्ये तीन नव्या प्लेअर्सला संधी दिली आहे.

भारत दौऱ्यासाठी घोषणा करण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या टेस्ट टीममध्ये तीन अनकॅप्ड प्लेअर्सला संधी देण्यात आली आहे. या तीन अनकॅप्ड प्लेअर्समध्ये फास्ट बॉलर एनरिच नोर्तये, स्पिनर ऑलराऊंडर सेनुरन मुथुसमी आणि विकेटकीपर रूडी सेकेंड्स यांचा समावेश आहे. यासोबतच टी-20 क्रिकेट टीममध्ये सुद्धा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये स्पिनर ऑलराऊंडर जॉर्न फॉर्त्युन आणि एनरिच नोर्तये यांचा समावेश आहे. तेम्बा बेवुमा याला सुद्धा या टीममध्ये पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे.

टी-20 क्रिकेट टीमचं कॅप्टनपद क्विटन डी कॉक याच्याकडे देण्यात आलं आहे. तर वाइस कॅप्टनपद वेन डर दुसेन याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. टेस्ट क्रिकेट टीमची जबाबदारी फाफु डु प्लेसिस याच्याकडे सोपवण्यात आली आहे. अॅडन मार्कराम, थियुनिस डी ब्रून आणि लुंगी नगिडी यांना टी-20 क्रिकेट टीममधून वगळण्यात आलं आहे. मात्र, त्यांना टेस्ट टीममध्ये संधी देण्यात आली आहे. इंडिया-ए विरुद्ध चार दिवसीय मॅच खेळत ते टेस्ट सीरिजची तयारी करणार आहेत. 

असा असेल दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा

तीन टी-20 मॅचेसची सीरिज

  1. पहिली टी-20 मॅच - 15 सप्टेंबर - धर्मशाला
  2. दुसरी टी-20 मॅच - 18 सप्टेंबर - मोहाली
  3. तिसरी टी-20 मॅच - 22 सप्टेंबर - बंगळुरू

तीन टेस्ट मॅचेसची सीरिज

  1. पहिली टेस्ट मॅच - 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टनम 
  2. दुसरी टेस्ट मॅच - 10 ते 14 ऑक्टोबर - मुंबई 
  3. तिसरी टेस्ट मॅच - 19 ते 23 ऑक्टोबर - रांची

दक्षिण आप्रिकेची टेस्ट टीम: फाफ डु प्लेसी (कॅप्टन), तेम्बा बेवुमा, थियुनिस डी ब्रूइन, क्विटन डी कॉक, डीन एल्गर, जुबेर हमजा, केशव महाराज, अॅडेन मार्कराम, सेनुराम मुथुसामी, लुंगी नगिडी, एनरिच नोर्तये, वर्नोन फिलेंडर, डेन पीट, कगीसो रबाडा आणि रूडी सेकेंड.

दक्षिण आफ्रिकेची टी-20 टीम: क्विटन डी कॉक (कॅप्टन), रासी वेन डर दुसेन, तेम्बा बेवुमा, जूनिअर डाला, जॉर्न फॉर्त्यून, ब्यूरन हेंडरीक्स, रीजा हेंडरीक्स, डेविड मिलर, एनरिच नोर्त्ये, एंडिले फेलुकवायो, ड्वेन प्रिटोरियस, कगीसो रबाडा, तबरेज शमसी आणि जोन-जोन स्मट्स.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
IND vs SA: भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकन टीमची घोषणा Description: South Africa tour India: दक्षिण आफ्रिकन टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत दौऱ्यासाठी क्रिकेट साऊथ आफ्रिका (सीएसए) ने दक्षिण आफ्रिकन टीमची घोषणा केली आहे.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...