Navjot Singh Sidhu: जेलमध्ये सिद्धूसाठी आहे हे स्पेशल डाएट

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 25, 2022 | 16:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Navjot Singh Sidhu: मेडिकल रिपोर्टमधून समोर आले आहे की सिद्धूच्या लिव्हरमध्ये इन्फ्केशनसोबतच त्याचे लिव्हर फॅटी झाले आहे. हेच कारण आहे की आता डॉक्टरांनी त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. 

navjyot singh siddhu
Navjot Singh Sidhu: जेलमध्ये सिद्धूसाठी आहे हे स्पेशल डाएट 
थोडं पण कामाचं
  • आता सिद्धूला जेलमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्पेशल डाएट दिले जाणार आहे
  • यात हलक्या जेवणाचा समावेश आहे.
  • सिद्धू गहू, साखर, मैदा आणि काही अन्य खाद्य पदार्थांचे सेवन करू शकत नाही

मुंबई: रोड रेज केसमध्ये पंजाबच्या पटियाला कोर्टात बंद माजी मंत्री नवज्योत सिंह सिद्धूची तब्येत बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याने जेलचे जेवण जेवण्यास नकार दिला होता यानंतर त्याची तब्येत बिघडली आहे आणि त्याला पटियालाच्या राजेंद्र रुग्णालयात दाखल करावे लागले. सिद्धूला १९८८मध्ये रोड रेज प्रकरणात एक वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. special diet for Navjot Singh Sidhu in jail

अधिक वाचा - बाईकच्या मागे बसतानाही हेल्मेट घाला, नाही तर होईल दंड 

सिद्धूच्या लीव्हरमध्ये इन्फेक्शन

आता सिद्धूला जेलमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्पेशल डाएट दिले जाणार आहे. यात हलक्या जेवणाचा समावेश आहे. सिद्धू गहू, साखर, मैदा आणि काही अन्य खाद्य पदार्थांचे सेवन करू शकत नाही. तो आता केवळ जांभूळ, पपई, पेरू, डबल टोन्ड दूध असेच खाद्यपदार्थ घेऊ शकतो. यात फायबर आणि कार्बोहायड्रेट नसेल. 

समोर आलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार सिद्धूच्या लिव्हरमध्ये इन्फेक्शनसह त्याचे लिव्हर फॅटी झाले आहे. हेच कारण आहे की डॉक्टरांनी आता त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच लो फॅट आणि फायबर फूड खाण्यास सांगितले आहे. कोर्टानेही सिद्धूला स्पेशल डाएट देण्यास परवानगी दिली आहे. 

जेलमध्ये मिळणार स्पेशल डाएट

माहितीनुसार सिद्धू आता जेलमध्ये काकडू, सूप, बीट, ज्यूस आणि फायबर फूड दिले जाणार आहे. सोबतच त्याला गव्हाची अॅलर्जी आहे त्यामुळे बाजरीपासून बनलेली भाकरी डाएटमध्ये दिली जाणार आहे. याशिवाय सिद्धूला मोसमी फळे खाण्याचा सल्ला दिला आहे.  यात टरबूज, कलिंगड, काकडी, स्ट्रॉबेरीचा समावेश आहे. याशिवाय टोमॅटो, लिंबू तो घेऊ शकतो. 

अधिक वाचा - ...पण मुघल सम्राटांच्या पत्नी कोण होत्या? ओवेसींचा प्रश्न

पंजाब काँग्रेसचा प्रमुख सिद्धूला २० मेला स्थानिक कोर्टासमोर सरेंडर केल्यानंतर पटियाला सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आले होते. १९८८मध्ये रोड रेज प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्याला एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या घटनेत गुरनाम सिंह नावाच्या ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी