cricket stories : अत्यंत चुरशीच्या सामन्यात सहा चेंडू आणि एक विकेट राखून स्पीड स्पोर्ट्स संघाचा थरारक विजय 

cricket u-14 premier league । मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल अंडर १४ प्रिमिअर लीग २०२१ स्पर्धेत   स्पीड स्पोर्ट्स क्लबने अत्यंत चुरशीच्या सामन्यात अॅडव्हान्स क्रिकेट अकादमीचा सहा चेंडू आणि एक विकेट राखून  पराभव केला. 

Speed Sports Club beat Advance Cricket Academy
अंडर १४ प्रिमिअर लीग स्पर्धेला सुरूवात 
थोडं पण कामाचं
  •   स्पीड स्पोर्ट्स क्लबने अत्यंत चुरशीच्या सामन्यात अॅडव्हान्स क्रिकेट अकादमीचा सहा चेंडू आणि एक विकेट राखून  पराभव केला.  
  • अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १६ स्पर्धेचे आयोजन करतात.
  • सुरूवातीला फलंदाजी करताना अॅडव्हान्स क्रिकेट अकादमीने निर्धारित ३५ षटकात सहा बाद १५२ धावा केल्या.

cricket stories  । मुंबई : मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या दिवंगत राम बरन मेमोरियल प्रिमिअर लीग २०२१ स्पर्धेत   स्पीड स्पोर्ट्स क्लबने अत्यंत चुरशीच्या सामन्यात अॅडव्हान्स क्रिकेट अकादमीचा सहा चेंडू आणि एक विकेट राखून  पराभव केला.  

अनिल जैसवाल यांनी आपल्या आजोबांच्या स्मृती प्रित्यर्थ आझाद मैदानावर अंडर १४ स्पर्धेचे आयोजन करतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या स्पर्धा झाल्या नाही. यावर्षी कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने छोट्या स्पर्धा  सर्व मार्गदर्शक नियम पाळून घेण्याची परवानगी मिळाली.  ४ जानेवारी रोजी स्पर्धेचे उद्घाटने करण्यात आले. 

या स्पर्धेचा पहिला सामना अत्यंत चुरशीचा झाला. सुरूवातीला फलंदाजी करताना अॅडव्हान्स क्रिकेट अकादमीने निर्धारित ३५ षटकात सहा बाद १५२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या स्पीड स्पोर्ट्स क्लबने ३३ व्या षटकापर्यंत आपले ९ गडी गमावले होते. अखेरच्या दोन षटकात ८ धावांची गरज होती.  एक गडी शिल्लक असताना स्पीड स्पोर्ट्सच्या संघातील अखेरच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करून संघाला सहा चेंडू आणि एक विकेट राखून  विजय मिळवून दिला. 

या सामन्यात अॅडव्हास क्रिकेट अकादमीकडून राजेश पटेल याने ११८ चेंडूत ६९ धावा केल्या. तर प्रतिपक्षी संघाकडून कार्तिक नाबाद ३५ आणि अर्जुन काळे याने २४ धावा केल्या. गोलंदाजांमध्ये अॅडव्हास क्रिकेट अकादमीकडून प्रतिक गोसावी याने ७ षटकात २ मेडन टाकत १९ देऊन २ विकेट घेतल्या. 

स्कोअरकार्ड पुढील प्रमाणे 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी