क्रीडामंत्र्यांनी रणजीमध्ये शतक झळकावून रचला इतिहास, बंगालची टिम पोहचली सेमिफायनलमध्ये

Manoj Tiwari Ranji Trophy: बंगाल संघाने रणजी ट्रॉफी 2022 हंगामाच्या उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे. आता त्याचा उपांत्य सामना मध्य प्रदेश संघाशी होणार आहे.

Sports Minister created history by scoring a century in Ranji, Bengal team in semi-finals
क्रीडामंत्र्यांनी रणजीमध्ये शतक झळकावून रचला इतिहास, बंगालची टिम पोहचली सेमिफायनलमध्ये ।   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • रणजी ट्रॉफी 2022 मध्ये बंगालचा संघ उपांत्य फेरीत
  • मनोज तिवारीने शतक ठोकले
  • बंगाल संघाच्या 9 फलंदाजांची अर्धशतके

मुंबई : बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी यांनी शुक्रवारी रणजी ट्रॉफीमध्ये 88 वर्षात कोणीही करू शकले नाही अशी कामगिरी केली. राज्याचे क्रीडामंत्री असताना शतक करणारा मनोज पहिला खेळाडू ठरला आहे. झारखंडविरुद्धच्या पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर बंगालने उपांत्य फेरीत धडक मारली. (Sports Minister created history by scoring a century in Ranji, Bengal team in semi-finals)

अधिक वाचा : 

Video: आवेश खानच्या घातक बॉलने बॅटचे झाले दोन तुकडे, पाहतच राहिला आफ्रिकन फलंदाज

सामन्याच्या पाचव्या दिवसाचा खेळ ही केवळ औपचारिकता होती, त्यात तिवारीने १३६ धावा केल्या. तिवारीने आपल्या क्षेत्राशी संबंधित फायलींवर स्वाक्षरी करण्याबरोबरच मैदानावर आपले फलंदाजीचे कौशल्य दाखवत आपल्या खेळीत 19 चौकार आणि दोन षटकार मारले.

बंगालने पहिल्या डावात 773 धावा 

संघाकडून शाहबाज अहमदने 46 धावा, अनुस्तुप मजुमदारने 38 धावा आणि अभिषेक पोरेलने 34 धावा केल्या. या तिघांनीही पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली होती. एकतर्फी उपांत्यपूर्व फेरीत बंगालने पहिल्या डावात 7 बाद 773 धावा केल्या.

अधिक वाचा : 

IND VS SA: पांड्याने दिनेश कार्तिकडून भावाच्या 'त्या' अपमानाचा घेतला बदला?

या खेळीसह बंगाल संघाच्या 9 फलंदाजांनी अर्धशतके झळकावून 250 वर्षांच्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या इतिहासात नवा विक्रम केला. झारखंडकडून शाहबाज नदीमने 59 धावांत पाच बळी घेतले. त्याचवेळी विराट सिंगने पहिल्या डावात 136 धावा केल्या.

अधिक वाचा : 

ENG vs NZ: END vs NZ मालिकेवर कोरोनाचे सावट; आता हा दिग्गज आढळला कोरोना पॉझिटीव्ह

उपांत्य फेरीचे दोन्ही सामने १४ जूनपासून होणार .

उपांत्य फेरीत बंगाल संघाचा सामना आता मध्य प्रदेशच्या संघाशी होणार आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीत मुंबईचा सामना उत्तर प्रदेशच्या संघाशी होणार आहे. हे दोन्ही उपांत्य फेरीचे सामने १४ जूनपासून खेळवले जाणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी