क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग होते, माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांचा स्ट्रेट ड्राइव्ह

spot fixing is easy and possible rather than match fixing says veteran cricketer anshuman gaekwad : क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग आणि वैयक्तिक फिक्सिंग होते असा स्ट्रेट ड्राइव्ह माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांनी मारला.

veteran cricketer
माजी कसोटीपटू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग होते
  • माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांचा स्ट्रेट ड्राइव्ह
  • मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते अंशुमन गायकवाड

spot fixing is easy and possible rather than match fixing says veteran cricketer anshuman gaekwad : क्रिकेटमध्ये मॅचफिक्सिंग नाही स्पॉटफिक्सिंग आणि वैयक्तिक फिक्सिंग होते असा स्ट्रेट ड्राइव्ह माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांनी मारला. दिग्गज क्रिकेटपटूंचा गौरव करण्यासाठी एजिस फेडरल इन्शुरन्स आणि लोकमान्य सेवा संघाने आयोजित केलेल्या गट्स आणि ग्लोरी क्रिकेट सन्मान संध्येत अंशुमन गायकवाड बोलत होते. सन्मान संध्येत अंशुमन गायकवाड आणि उमेश कुलकर्णी या दिग्गजांना दिलीप वेंगसरकर आणि करसन घावरी या दिग्गजांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

गट्स आणि ग्लोरी क्रिकेट सन्मान संध्या मुंबईत झाली. याप्रसंगी दिग्गज कसोटीपटूंनी अशी जोरदार बॅटिंग केली की पु.ल. देशपांडे सभागृहात मैदानावरच्याच नव्हे तर मैदानाबाहेरच्या किश्श्यांचा अक्षरश: पाऊस पडला. क्रिकेट किश्श्यांचा काळ सत्तरी- ऐंशीच्या दशकातला असला तरी टी-ट्वेण्टीच्या पॉवरप्ले मधल्या धडाकेबाज खेळाला लाजवेल अशी चौकार-षटकारांच्या हास्याची आतषबाजी क्रिकेटच्या धुरंधरांनी केली.

क्रिकेटच्या मैदानावर मोठी दुर्घटना!, गोलंदाजाच्या रागाचा Venkatesh Iyer ठरला बळी

दिग्गज क्रिकेटपटूंचे किस्से ऐकायला क्रिकेटच्या दर्दी प्रेक्षकांनी तुडुंब भरलेल्या सभागृहात क्षणाक्षणाला हास्याचे कारंजे उसळत होते. या सन्मान संध्येबद्दल एजिस फेडरलचे सर्वेसर्वा विघ्नेन शहाणे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल क्रिकेटप्रेमींसह क्रिकेटपटूंनीही मनापासून आभार मानले. याप्रसंगी सर्वात वयस्कर भारतीय कसोटीपटू असलेल्या दत्ताजीराव गायकवाड यांच्या कारकिर्दीवर आधारित चित्रफितही दाखविण्यात आली. या फितीत चंदू बोर्डे यांनी त्यांच्या असंख्य आठवणी ताज्या केल्या.

गायकवाड यांना कार्यक्रमाचे सुत्रसंचालक द्वारकानाथ संझगिरी यांनी 1997 साली निधास ट्रॉफीच्या वेळी श्रीलंकेत झालेल्या मॅचफिक्सिंगच्या प्रकाराबाबत छेडले. संझगिरींच्या प्रश्नावर उत्तर देताना गायकवाड म्हणाले, मला श्रीलंकेविरूद्धच्या फायनलपूर्वी मध्यरात्री एक निनावी फोन आला. त्याने सांगितले, फायनल फिक्स झालीय. भारत हरणार आहे. हे ऐकून माझा विश्वास बसत नव्हता. मी संघातल्या मुख्य खेळाडूंशी चर्चा केली. मग सचिन असो किंवा अझर. दोघांनीही विश्वास दिला की असे काही झालेले नाही. फायनल आपणच जिंकणार. तरीही मी प्रशिक्षक म्हणून खूप काळजी घेतली. जसं आम्ही मॅचपूर्वी प्लॅनिंग केलं होतं तसेच आमचे खेळाडू खेळले आणि फायनल आपण जिंकलो. त्यामुळे माझा मॅच फिक्सिंगवर विश्वास नाही. मॅच फिक्सिंग होत नाही. मॅच फिक्स करण्यासाठी दोन्ही संघातले किमान चार-पाच खेळाडू त्यात सहभागी असायला हवेत. पण असे होत असावे मला वाटत नाही. पण मॅच फिक्सिंग झाल्याचे लोकं म्हणतात. तसे सिद्धही झालेय. क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंगपेक्षा स्पॉट फिक्सिंग किंवा वैयक्तिक फिक्सिंग शक्य असल्याचेही ठाम मत गायकवाड यांनी मांडले.

Team India: या खेळाडूला BCCI ने बनवला टीम इंडियाचा कर्णधार, अचानक दिली मोठी जबाबदारी

कपिलला थांब सांगणं कठिण होतं...

भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू कपिल देवला त्याच्या निवृत्तीबाबत सांगणं आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते. तेव्हा मी निवड समितीचा अध्यक्ष होतो. सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम नोंदविल्यानंतर कपिलने निवृत्ती जाहीर करावी, असे सर्वांचे मत होते, पण पामानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कपिलने आणखी दोन वर्ष खेळणार असल्याचे जाहीर करताच आमच्या सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कपिलने आता थांबायला हवं, असे सर्वाना वाटत होते, पण त्याला हे सांगणार कोण? ही जबाबदारी सर्वांनी माझ्याच खांद्यावर टाकली. पण कपिलनेही एका महान खेळाडूप्रमाणे माझे ऐकले आणि सन्मानाने पुढच्याच सामन्यात निवृत्ती जाहीर केली, अशी आठवण अंशुमन गायकवाड यांनी सांगितली.

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या प्रशिक्षकपदी हा दिग्गज क्रिकेटर

अंशुमन गायकवाड यांची फलंदाजी

कॉलेजमध्ये असताना क्रिकेट चांगले खेळू लागलो. पुढे भारतीय संघासाठी खेळू लागलो. वेगाने येणाऱ्या चेंडूंना संयमाने सामोरा जातो असे वाटले म्हणून संघ व्यवस्थापनाने मला विंडीज विरुद्ध सलामीला पाठवले. रॉबर्टस-होल्डिंगसमोर अवघा भारतीय संघ जायबंदी होत असताना लढवलेला किल्ला आणि खेळ संपल्यानंतर थेट आयसीयूमध्ये दाखल होऊन घेतलेले उपचार याविषयी अंशुमन गायकवाड यांनी सांगितले. 

दगडाने नारळ पाडण्याचा कलेने झालो गोलंदाज

भारताचे एकेकाळचे वेगवान गोलंदाज उमेश कुलकर्णी यांचा क्रिकेटप्रवासही अचंबित करणार होता. सन्मानमूर्ती कुलकर्णी आपल्या क्रिकेटप्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना म्हणाले, अलिबागला दगडाने नारळ पाडण्याच्या माझ्या कलेमुळे मी गोलंदाज झालो. दगड मारण्याची कलाच माझी गोलंदाजीची स्टाईल झाली. माझ्या या प्रकारामुळे आईने मला माझ्या मामांकडे गिरगावला धाडले. गिरगावला पोहोचल्यावर शालेय क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. पण तेव्हा माझ्याकडे ना क्रिकेटचे कपडे होते ना शूज. माझ्या क्रिकेटप्रवासाची खडतर सुरूवात अनवाणीच झाली.हॅरिस शिल्डच्या सामन्यातही हीच परिस्थिती होती, तेव्हा मित्रांचे कपडे आणि शूज घेऊन खेळलो होतो आणि याच अवस्थेतून मी भारतीय संघापर्यंत पोहोचल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी