[video] दुती चंदने रचला इतिहास, वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्समध्ये जिंकले गोल्ड मेडल 

क्रिकेट वर्ल्ड कप २०१९
Updated Jul 10, 2019 | 20:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

दुती चंदने ३० व्या समर युनिवर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. त्याने ११.३२ सेकंदाचा वेळ घेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. 

duti chand win gold medal
दुती चंदने जिंकले सुवर्ण पदक   |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • दुतीने रचला इतिहास, वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्समध्ये १०० मीटरचे पटकावले पहिले सुवर्ण
  • दुतीचे केले राष्ट्रपतींने अभिनंदन
  • हिमा दासनंतर ओडिशाची दुसरी खेळाडू जिने जिंकले सुवर्ण पदक

नपोली :  राष्ट्रीय रेकॉर्डधारी दुती चंद वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून या गेम्समध्ये अव्वल राहणारी पहिली भारतीय महिला ट्रॅक अँड फिल्ड खेळाडू बनली आहे. तेवीस वर्षांच्या दुतीने ११. ३२ सेकंदाचा वेळ घेते ही रेस जिंकली आहे. चौथ्या लेकमध्ये पळताना आठ खेळाडूत पहिला क्रमांकावर राहीली आहे. स्वित्झलँडच्या डेल पोंटे हिने ११. ३३ सेकंदाचा वेळ घेत दुसरे स्थान पटकावले आहे. जर्मनीच्या लिसा क्वायीने कांस्य पदक जिंकले आहे. 

ओडिशाच्या दुती वैश्चि स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी हिमा दासनंतर दुसरी भारतीय एथलीट बनली आहे. हिमाने गेल्या वर्षी वर्ल्ड जुनियर एथलेटिक्स चॅम्पियशीपमध्ये ४०० मीटरमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. दुतीने एशिया स्पर्धेत २०१८ मध्ये १०० आणि २०० मीटरमध्ये सिल्व्हर मेडल मिळवले होते. ती युनिवर्सिटी गेम्समध्ये सुवर्ण पदक जिंकणारी दुसरी भारतीय खेळाडू बनली आहे. 

यापूर्वी इंदरजीत सिंह याने २०१५ मध्ये पुरूषांच्या शॉटपूटमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. नुकतेच समलैगिक संबंध असल्याची कबुली करणाऱ्या दुतीने जिंकल्यानंतर म्हटले की, मला खाली पाडण्याचा प्रयत्न कराल पण मी मजबूतीने परत येणाराच. 

 

 

ती म्हणाली, इतक्या वर्षांची मेहनत आणि तुमच्या आशीर्वदामुळे मी वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर  धावण्या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले यापूर्वी तीन ११.४१ सेकंदाचा वेळ घेत फायनलमध्ये प्रवेश केला होता. दुतीला आता सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये दोहामध्ये होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशीपसाठी क्वालीफाय करायचे आहे. 

राष्ट्रपती रामनाध कोविंद यांनी दुतीला ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत. ते म्हणाले, युनिवर्सिटी गेम्समध्ये १०० ममीटर जिंकल्याबद्दल दुतीचे अभिनंदन.. हे भारताचे या गेम्समधील पहिले सुवर्ण पदक आहे, आम्हांला हा गौरव वाटतो. ही कामगिरी ओलंपिकसाठी तीने कायम ठेवली पाहिजे. 

क्रीडा मंत्री किरन रीजीजूने सांगितले, मी लहानपणापासून या खेळात सुवर्णपदकाची वाट पाहत होतो. अखेर भारताला सुवर्णपदक मिळाले. दुती चंदला वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्समध्ये सुवर्ण जिंकण्याच्या शुभेच्छा... 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
[video] दुती चंदने रचला इतिहास, वर्ल्ड युनिवर्सिटी गेम्समध्ये जिंकले गोल्ड मेडल  Description: दुती चंदने ३० व्या समर युनिवर्सिटी गेम्समध्ये १०० मीटर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. त्याने ११.३२ सेकंदाचा वेळ घेत सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. 
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola