IPL 2023 SRH vs RR :आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये रविवारी (2 एप्रिल) चौथ्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता हैदराबाद (Hyderabad) येथे सुरू होईल. यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर दोन्ही संघ आमने-सामने येणार असून भुवनेश्वर की संजू सॅमसन कोण मारणार बाजी? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (SRH vs RR IPL 2023: Hyderabad will face Rajasthan today)
अधिक वाचा : अमूल दूध पुन्हा महागले, लिटरमागे दोन रुपयांची वाढ
राजस्थानला आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. रविवारी डबल हेजरचा दिवस असून हा सामना दिवसाचा पहिला सामना असेल. हैदराबादलाही घरच्या मैदानावर विजयाने सुरुवात करायची आहे. हा संघ देखील यंदा नव्या ढंगात दिसणार आहे आणि या हंगामात अनेक नवीन खेळाडू घेऊन प्रवेश करत आहेत. पण त्याचसोबत या संघात अशी नावे आहेत जी दीर्घकाळ SRH च्या संघाशी जोडलेले आहे. राजस्थानचा सर्वोत्तम फलंदाज विरुद्ध हैदराबादचा सर्वोत्तम गोलंदाज अशी ही चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
अधिक वाचा : केस जास्तच गळतायत? मग रोजच्या या सवयींमध्ये तात्काळ करा बदल
राजस्थान रॉयल्स संघ: संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा, कुणाल सिंग राठोड, अब्दुल बासिथ, डोनाव फरेरा, ध्रुव जूरेल, कुलदीप सेन, कुलदीप यादव, केएम आसिफ, केसी करिअप्पा, आकाश वसिष्ठ, नवदीप सैनी, मुरुगन अश्विन, अॅडम झम्पा, जेसन होल्डर, जो रूट.
अधिक वाचा : Viral Video : दोन मुलींसोबत तरुणाचा बाईकवर जीवघेणा स्टंट
सनरायझर्स हैदराबाद असोसिएशन: भुवनेश्वर कुमार (कर्णधार), हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, अब्दुल समद, अभिषेक शर्मा, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, आदिल रशीद, अकेल हुसेन, उमरान मलिक, टी नटराजन, समर्थ व्यास, अनमोलप्रीत सिंग, मयंक डागर , उपेंद्र यादव, मयंक मार्कंडे, कार्तिक त्यागी, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, नितीश रेड्डी, विव्रत शर्मा.