श्रीलंका-बांगलादेश मॅचमध्ये शाब्दिक चकमक

टी २० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सुपर बारा फेरीतील तिसऱ्या मॅचमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली.

Sri lanka vs bangladesh words exchange between lahiru kumara and liton das 
श्रीलंका-बांगलादेश मॅचमध्ये शाब्दिक चकमक 
थोडं पण कामाचं
  • श्रीलंका-बांगलादेश मॅचमध्ये शाब्दिक चकमक
  • लाहिरू कुमारा-लिंटन दास यांच्यात शाब्दिक चकमक
  • थोडा वेळ मैदानात तणावाचे वातावरण

शारजा: टी २० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत सुपर बारा फेरीतील तिसऱ्या मॅचमध्ये श्रीलंका आणि बांगलादेशच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. या चकमकीमुळे थोडा वेळ मैदानात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. Sri lanka vs bangladesh words exchange between lahiru kumara and liton das 

श्रीलंकेचा बॉलर लाहिरू कुमारा याने सहाव्या ओव्हरचा पाचवा बॉल टाकला आणि बांगलादेशच्या लिटन दासला बाद केले. दासुन शनाकाने दासने मारलेला फटका झेलला. दास झेलबाद झाला. पॅव्हेलियनमध्ये जाण्याआधी दास काही तरी बोलला. ते शब्द कानावर पडताच प्रत्युत्तर देण्यासाठी लाहिरू कुमारा सरसावला. पण वाद वाढू नये म्हणून श्रीलंकेचे इतर खेळाडू वेगाने पुढे आले, त्यांनी लाहिरू कुमाराला लिटन दासपासून दूर केले. लिटन दास १६ बॉलमध्ये १६ धावा करुन परतला. दासच्या रुपयाने बांगलादेशला पहिला धक्का बसला.

याआधी श्रीलंकने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने वीस ओव्हरमध्ये चार बाद १७१ धावा केल्या. मोहम्मद नईमने ६२, लिटन दासने १६, शाकिब अल हसनने १०, मुशफिकर रहिमने नाबाद ५७, अफिफ होसेनने ७ (धावचीत), कॅप्टन असलेल्या महमुदुल्लाने नाबाद १० धावा केल्या. श्रीलंकेकडून चमिका करुणारत्ने, बी. फर्नांडो आणि लाहिरू कुमारा या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

अखेरचे वृत्त हाती आले त्यावेळी श्रीलंकेने १४.३ ओव्हरमध्ये ४ बाद १२४ धावा केल्या होत्या आणि खेळ सुरू होता. लंकेच्या कुसल परेराने १, पथुम निसानकाने २४, अविष्का फर्नांडोने शून्य, वानिंदु हसरंगाने ६ धावा केल्या होत्या. चरित असलंका ६४ धावांवर आणि भानुका राजपक्षे २३ धावांवर खेळत होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी