Roshan Mahanama: श्रीलंकेचा विश्वकप विजेता क्रिकेटर रोशन महानामा पेट्रोल पंपावर लोकांना देतोय चहा 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 22, 2022 | 10:54 IST | टाइम्स नाऊ मराठी

Roshan Mahanama Selling Tea । श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळून आता जवळपास ७५ वर्षांचा कालावधी होत आला आहे. १९४८ मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक मंदीचा सामना करत आहे.

Sri Lanka's World Cup-winning cricketer Roshan Mahanama giving tea to people at a petrol pump
विश्वकप विजेता खेळाडू चक्क पेट्रोल पंपावर लोकांना देतोय चहा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळून आता जवळपास ७५ वर्षांचा कालावधी होत आला आहे.
  • श्रीलंकेमध्ये भीषण आर्थिक संकट.
  • विश्वकप विजेता खेळाडू चक्क पेट्रोल पंपावर लोकांना देतोय चहा.

Roshan Mahanama Selling Tea । मुंबई : श्रीलंकेला स्वातंत्र्य मिळून आता जवळपास ७५ वर्षांचा कालावधी होत आला आहे. १९४८ मध्ये युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच श्रीलंका सर्वात वाईट आर्थिक मंदीचा सामना करत आहे. मागील वर्षाच्या अखेरीपासून देशात अन्न, औषधे आणि इंधन यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंची तीव्र टंचाई जाणवत आहे. महागाईनेही विक्रमी उच्चांक गाठला आहे. या सगळ्यामध्ये श्रीलंका क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर फलंदाज रोशन महानामा पेट्रोल पंपावर चहा विकताना पाहायला मिळत आहे. रोशन महानामा हा १९९६ मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या श्रीलंका क्रिकेट संघातील प्रमुख सदस्यांपैकी एक आहे. (Sri Lanka's World Cup-winning cricketer Roshan Mahanama giving tea to people at a petrol pump). 

अधिक वाचा : गंदी बात'च्या बोल्ड सीनमुळे नीताला रातोरात मिळाली प्रसिद्धी

रोशन महानामाने जिंकली अनेकांची मने 

दरम्यान, रोशन महानामाने त्याच्या ट्विटरवरून काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये तो पेट्रोल पंपाबाहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांना चहा देताना दिसत आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. रोशन महानामाने फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "आम्ही 'कम्युनिटी मील शेअर'च्या टीमसोबत आज संध्याकाळी वॉर्ड प्लेस आणि विजेरामा मावठा येथील पेट्रोल पंपाबाहेर रांगेत उभ्या असलेल्या लोकांना चहा दिला आहे." 

त्यांने पुढे लिहिले की, "दिवसेंदिवस लोकांची रांग वाढत चालली आहे. या रांगेत उभ्या असलेल्या लोकांच्या आरोग्याला धोका आहे." दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने लिहिले की, "कृपया इंधनासाठी रांगेत उभे असलेले लोक एकमेकांची काळजी घ्या. पुरेसे अन्न आणि पाणी सोबत आणा. तुमची प्रकृती ठीक नसल्यास कृपया तुमच्या जवळच्या व्यक्तीशी संपर्क साधा आणि मदतीसाठी विचारा किंवा १९९० वर कॉल करा. या कठीण काळात एकमेकांची काळजी घेणे गरजेचे आहे.

श्रीलंकेवर भीषण आर्थिक संकट

लक्षणीय बाब म्हणजे श्रीलंकेचा देश जीवनावश्यक वस्तूंच्या आयातीसाठी डॉलर्स उभारण्यास अपयशी झाला आहे. देशात अनेक दिवसांपासून विजेचे संकट आहे. आर्थिक संकटामुळे श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलसाठीही संघर्ष सुरू आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मुलभूत गरजांसाठी जास्त किमती मोजून लोकांना तासनतास वाट पाहावी लागते आहे. या सर्व प्रकारामुळे अध्यक्ष गोटाबाया यांना राजीनामा द्यावा लागला होता. 

३१ मे १९६६ रोजी कोलंबो येथे जन्मलेल्या रोशन महानामा याने श्रीलंकेसाठी ५२ कसोटी आणि २१३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत २५७६ धावा आणि एकदिवसीय सामन्यात ५१६२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची ४ कसोटी आणि तितकीच एकदिवसीय शतके आहेत. त्‍याने कसोटी क्रिकेटमध्ये ११ आणि एकदिवसीयमध्‍ये ३५ अर्धशतके झळकावली आहेत. १९९९ च्या विश्वचषकानंतर रोशन महानामाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी