T20 World Cup 2021: श्रीलंकेच्या कर्णधाराने करून दाखवले अशक्य ते शक्य...घेतला असा कॅच की...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Oct 19, 2021 | 16:09 IST | टाइम्स नाऊ मराठी

शनकाने सामन्यात दोन कॅच पकडले आणि दोन्हीही कॅच कमाल होते. दुसऱ्या कॅचचे तर काय म्हणणे...हा असा कॅच होता की जो अशक्य तो शक्य झाला. 

catch
T20 World Cup 2021: लंकेच्या कर्णधाराने केले अशक्य ते शक्य 
थोडं पण कामाचं
  • दासुन शनकाने मॅचमध्ये पकडलेला हा दुसरा कॅच होता.
  • शनकाने सामन्यात दोन कॅच पकडले आणि दोन्हीही कॅच कमालीचे होते
  • दुसऱ्या कॅचबाबत तर काय बोलायचे. त्याने हा अशक्यप्राय कॅच शक्य बनवला

मुंबई: क्रिकेटमध्ये ही म्हण प्रसिद्ध आहे ती म्हणजे पकडा कॅच, जिंका मॅच. श्रीलंकेने तेच केले. नामिबियाविरुद्धच्या आपल्या पहिल्या वॉर्म अप सामन्यात कॅच पकडून सामना जिंकून दिला. सगळ्यात शानदार होता श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनकाचा कॅच. शनकाने सामन्यात दोन कॅच पकडले आणि दोन्हीही कॅच कमालीचे होते. दुसऱ्या कॅचबाबत तर काय बोलायचे. त्याने हा अशक्यप्राय कॅच शक्य बनवला. तो कॅच पाहून साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 

नामिबियाच्या डावाचा १९वी ओव्हर सुरू होती. गोलंदाज होता श्रीलंकेचा चामिरा. या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलला नामिबियाचा फलंदाज रुबेनने सरळ शॉट खेळला. बॉल हवेत गोलंदाजाच्या दिशेने गेली. मात्र चामिराला वाटले की तो कॅच पकडू शकणार नाही यासाठी त्याने प्रयत्नही केले नाहीत. मात्र तेव्हा समजले की फलदाज रुबेनची विकेट पडली. त्याचा कॅच पकडला गेला होता. हा कॅच जो चामिराला अशक्यप्राय वाटल्याने त्याने तो सोडून दिला होता. मात्र हा कॅच शक्य करून दाखवला श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनकाने. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

अशक्य कॅचला बनवले शक्य

बॉल जेव्हा ग्राऊंडला हिट करणार होता. त्याच्याआधीच शनकाने त्याला आपल्या मुठीत घेतले. हे पाहून स्टेडियममधील लोकांनी आश्चर्यानी तोंडात बोटे घातली. कोणालाच विश्वास बसला नाही की त्याने असे काही केले. 

शनकाने पकडला कॅच, श्रीलंकेने जिंकली मॅच

दासुन शनकाने मॅचमध्ये पकडलेला हा दुसरा कॅच होता. या कमाल कॅचआधी त्याने नामिबियाचा सलामी फलंदाज जेन ग्रीनचा पकडला होता. श्रीलंकेने नामिबियाविरुद्धचा सामना ३९ चेंडूत ७ विकेटनी जिंकला. पहिल्यांदा खेळताना नामिबियाचा संपूर्ण संघ २० ओव्हरही खेळू शकला नाही. त्यांचा संघ १९.३ ओव्हरमध्ये ९६ धावांवर बाद झाला. श्रीलंकेच्या महीश तिकसानाने ३ विकेट मिळवल्या. जर वानिंदु आणि लाहिरू कुमाराला २-२ विकेट मिळवल्या. प्रत्युत्तरात ९७ धावांचे आव्हान श्रीलंकेने १३.३ ओव्हरमध्ये ३ विकेट गमावत पूर्ण केले. श्रीलंकेच्या राजपक्षाने ४२ धावांची नाबाद खेळी केली. तर अविष्का फर्नांडोने नाबाद ३० धावा केल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी