SL vs WI: श्रीलंकेचा धनंजय डे सिल्वा विचित्र पद्धतीने झाला बाद, पाहा VIDEO

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 23, 2021 | 20:05 IST | टाइम्स नाऊ मराठी

डी सिल्वा याआधी २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कच्या बॉलवर हिट विकेटवर बाद झाला होता. तो टेस्ट क्र्किटेमध्ये हिट विकेट बाद होणारा श्रीलंकेचा दुसरा फलंदाज आहे.

de silva
VIDEO: श्रीलंकेचा धनंजय डे सिल्वा विचित्र पद्धतीने झाला बाद 
थोडं पण कामाचं
  • डी सिल्वा श्रीलंकेचा डाव ९५ व्या ओव्हरमध्ये शेनन गॅब्रियलच्या बॉलवर हिट विकेट आऊट होत पॅव्हेलियनमध्ये परतला.
  • आऊट होण्याआधी तो एकाच बॉलवर तीन शॉट खेळला.
  • धनंजयच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांच्या मजेदार कमेंट्सही येत आहेत.

मुंबई: यजमान श्रीलंका(srilanka) आणि वेस्ट इंडिज(west indies) यांच्यात गॉलमध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात श्रीलंकेचा फलंदाज धनंजय डी सिल्वा(Dhananjaya de Silva) विचित्र अंदाजात बाद झाला. त्याचा व्हिडिओ(video) सोशल मीडियावर(social media) चांगलाच व्हायरल होत आहे. डी सिल्वा श्रीलंकेचा डाव ९५ व्या ओव्हरमध्ये शेनन गॅब्रियलच्या बॉलवर हिट विकेट आऊट होत पॅव्हेलियनमध्ये परतला. आऊट होण्याआधी तो एकाच बॉलवर तीन शॉट खेळला. धनंजयच्या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावर चाहत्यांच्या मजेदार कमेंट्सही येत आहेत. srilanka dhanajaya de silva hit out wicket in match against west indies          

डी सिल्वा चांगल्या फॉर्ममध्ये वाटत होता. मात्र श्रीलंकेच्या डावाच्या ९५व्या ओव्हरमध्ये शेनन गॅब्रियलच्या चेंडूवर त्याने बॅकफूटवर डिफेन्स केला आणि चेंडू हवेत गेला. यानंतर त्याने बॉल विकेटवर लावण्यापासून बचाव करण्याचा खूप प्रयत्न केला. या प्रयत्नात तो बॅटला बॉलच्या जागी स्टंपवर मारला आणि हिट विकेट आऊट होत पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याचा बाद होण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

सिल्वाचा विचित्र रेकॉर्ड

डी सिल्वा याआधी २०१९मध्ये ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्कच्या बॉलवर हिट विकेटवर बाद झाला होता. तो टेस्ट क्र्किटेमध्ये हिट विकेट बाद होणारा श्रीलंकेचा दुसरा फलंदाज आहे. त्याआी रोमेश कालूविर्तणा १९९७मध्ये दोनदा हिट विकेट बाद झाला होता. डी सिल्वाने ९५ बॉलमध्ये ६१ धावा केल्या. त्याशिवाय दिमुथ करूणारत्ने १४७ धावा केल्या. श्रीलंकेला पहिल्या डावात ३८६ धावांवर बाद झाले.

सामन्याच्या पहिल्या दिवशीही अपघात झाला होता. वेस्ट इंडिजच्या एका प्लेयरला फिल्डिंग करताना बॉल लागला होता आणि त्याला स्ट्रेचरवर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. 

भारताचा हर्षल पटेलही झाला होता हिट विकेट

काल भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी-२० साम्यादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलही फलंदाजीदरम्यान फर्ग्युसनच्या बॉलवर हिट विकेट झाला होता. तो लोकेश राहुलनंतर हिट विकेट बाद होणारा दुसरा भारतीय फलंदाज आहे. 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी