करिअरच्या पहिल्या ६ वर्षात केली केवळ १ धाव, नंतर नशिबाने पलटली बाजी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated May 31, 2021 | 13:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

श्रीलंकेचा माजी कर्णधार मार्वन अट्टापट्टू (Marvan Atapattu) ने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण १९९०मध्ये भारताविरुद्धच्या कसोटीद्वारे केले होते. आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात अट्टापट्टूच्या नशिबाने त्याला धोका दिला

Marvan Atapattu
करिअरच्या पहिल्या ६ वर्षात केली केवळ १ धाव, नंतर पलटले नशीब 

थोडं पण कामाचं

  • श्रीलंकेचा माजी कर्णधार मार्वन अट्टापट्टूने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण १९९०मध्ये भारताविरुद्धच्या कसोटीद्वारे केले होते.
  • २ वर्षानंतर १९९२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलंबो कसोटीत अट्टापटट्टूला संधी मिळाली मात्र येथेही त्याला नशिबाने साथ दिली नाही.
  • कसोटीत अट्टापट्टूने ९० सामने खेळत ५५०२ धावा केल्या

मुंबई: कोणत्याही क्रिकेटरला एक महान फलंदाज बनण्यासाठी करिअरमध्ये प्रत्येकवेळेस स्वत:ला सिद्ध करावे लागते. मिळालेली संधी ही शेवटची संधी समजून मैदानावर उतरावे लागते आणि तेव्हाच तो क्रिकेटर आपल्या करिअरमध्ये त्या ठिकाणी पोहोचतो ज्या ठिकाणी आज सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली (Virat Kohli) सारखे महान फलंदाज आहेत. मात्र काही क्रिकेटर्सचे नशीब असे असते की त्यांची सुरूवात चांगली नसते मात्र त्यानंतर ते आपल्या देशाचे सर्वोत्तम फलंदाज बनतात. ताजे उदाहरण म्हणजे रोहित शर्मा(Rohit Sharma) ज्याच्या करिअरच्या सुरूवातीला त्याची कामगिरी सपशेल खराब होती. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनी(Dhoni) ने त्याच्यातील प्रतिभा ओळखली आणि त्याला सातत्याने संधी दिल्या. (Srilanka former captain Marvan Atapattu birthday special story)

सध्याच्या घडीला रोहित जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मात्र रोहित आधीही असा एक क्रिकेटर होता ज्याचे नशीब तब्बल ६ वर्षे त्याच्यावर रूसले होते मात्र त्यानंतर मिळालेल्या संधीने त्या खेळाडूने आपल्या नशिबाचे टाळे खोलले आणि त्यानंतर तो आपला देशाकडून आंतरराष्ट्र्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज ठरला. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून श्रीलंकेचा माजी कर्णधार मार्वन अट्टापटू(Marvan Atapattu)होता.

करिअरच्या पहिल्या ६ वर्षात केली एक धाव

श्रीलंकेचा माजी कर्णधार मार्वन अट्टापट्टूने आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण १९९०मध्ये भारताविरुद्धच्या कसोटीद्वारे केले होते. आपल्या पहिल्याच सामन्यात अट्टापट्टूला त्याच्या नशिबाने धोका दिला. दोन्ही डावात तो एकही धाव न करा बाद झाला. पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरल्यांतर त्याला संघाबाहेर जावे लागले होते. करिअरमध्ये मार्वन अट्टापट्टूला दुसरा कसोटी सामना खेळण्याची संधी २ वर्षानंतर मिळाली. आपल्या टेस्ट करिअरमधील पहिल्या १७ डावांदरम्यान ६ डावांत तो डक आऊट झाला होता. 

२ वर्षानंतरही फ्लॉप ठरला होता अट्टापट्टू

२ वर्षानंतर १९९२मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोलंबो कसोटीत अट्टापटट्टूला संधी मिळाली मात्र येथेही त्याला नशिबाने साथ दिली नाही. आपल्या करिअरटच्या दुसऱ्या टेस्टमध्ये अट्टापट्टू पहिल्या डावात शून्यावर तर दुसऱ्या डावात केवळ एकच धाव करू शकला. हे पाहिल्यावर असे वाटत होते की अट्टापट्टूचे करिअऱ संपतेय की काय. मात्र त्यानंतर त्याला नशिबाने साथ दिली. १९९६मध्ये अट्टापट्टूला मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. मात्र त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. 

कसोटीत अट्टापट्टूने ९० सामने खेळत ५५०२ धावा केल्या. यात १६ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीत त्याची सरासरी ३७.५२ इतकी होती. कसोटीत या फलंदाजाने ६ वेळा द्विशतक ठोकण्याची कमाल केली. यानंतर वनडेतही त्याची फलंदाजी धारदार राहिली होती. तो वनडेत २८६ धावा खेळला. यात त्याने ८५२९ धावा केल्या. यात ११ शतक आणि ५९ अर्धशतकांचा समावेश आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी