कोरोनाच्या प्रकोपादरम्यान पहिल्यांदा आशियामध्ये रंगणार टी-२० स्पर्धा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 29, 2020 | 12:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

srilanka premier league: अव्वल संघ फायनलसाठी पात्र ठरतील.. दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थाावरील संघांमध्ये एलिमिनेटरचा सामना खेळवला जाईल. यात जिंकणारा संघ अव्वल असलेल्या संघाविरुद्ध खेळेल. 

cricket
कोरोनाच्या प्रकोपादरम्यान पहिल्यांदा आशियामध्ये रंगणार टी-२० 

थोडं पण कामाचं

  • श्रीलंकेने दाव केला आहे की येथे कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड नाही. याच कारणामुळे २८ जून म्हणजेच रविवारी सरकारने लॉकडाऊनही हटवला आहे.
  • टूर्नामेंट डबल राऊंड रॉबिन फॉर्मटमध्ये खेळवली जाईल
  • श्रीलंकेत २९ जून म्हणजेच सोमवारपासून टी-२० लीगला सुरूवात होत आहे.

मुंबई: कोरोना व्हायरसमुळे जगभरातील खेळांच्या स्पर्धांवर लावलेले निर्बंध आता हळू हळू कमी होत आहेत. सगळ्यात आधी फुटबॉलची स्पर्धा सुरू झाली. त्यानंतक काही अन्य खेळ बंद दरवाजाम्ये सुरू झाले. पुढील महिन्यात रिकाम्या स्टेडियममध्ये इंग्लंडची क्रिकेट टीम वेस्ट इंडिजविरुद्ध तीन टेस्ट सामन्यांची सीरिज खेळवली जाईल. आशियामध्येही आता क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. श्रीलंकेत २९ जून म्हणजेच सोमवारपासून टी-२० लीगला सुरूवात होत आहे. यात दिग्गज क्रिकेटर तिलकरत्ने दिलशान, दसुन शनाका,अजंथा मेंडिस आणि परवेज महरूफही दिसतील. 

स्पर्धेसाठी श्रीलंकेच्या सरकारकडून परवानगी घेण्यात आली आहे. श्रीलंकेने दाव केला आहे की येथे कोरोनाचा कम्युनिटी स्प्रेड नाही. याच कारणामुळे २८ जून म्हणजेच रविवारी सरकारने लॉकडाऊनही हटवला आहे. टूर्नामेंट डबल राऊंड रॉबिन फॉर्मटमध्ये खेळवली जाईल. अव्वल संघ फायनलसाठी पात्र राहील. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावरील संघ एलिमिनेटर सामन्यासाठी खेळतील. यात जिंकणारा संघ फायनलमध्ये अव्वल संघाविरुद्ध खेळेल. या स्पर्धेचे प्रसारण fancode app, youtube आणि facebook वर होईल. 

संघ आणि खेळाडू(teams and player)

मोनारगाला हॉर्नेट्स(monargala hornets): तिलकरत्ने दिलशान(कर्णधार), अजित एकानायके, कसुन सेनानायके, बिनरू फर्नांडो, श्रियान विजेरत्ने, चेतन डी सिल्वा, ध्यान रणतुंगा, चामिंडा सिल्वा, इमेश उदयंगा, चितुरंगा कुमारा, प्रदीप विथर्ना, निशान मेंडिस, उमेश करूणारत्ने, मार्क नवंजया, सचित्रा, सेरसिंघे.

युनिलियन्स महियांगनया(unilions mahiyanganaya):थिलन तुसारा(कर्णधार), हरेन सिल्वा, मनेला उदरवटे, अनुरुद्ध रायपक्ष, मलिंदा लोकुंदटिगे, कविदु गुणारत्ने, सदनल एलवाल्गे, श्रियान चंडीमल, हसनजीत मुनावीरा, अमल अनापनु, बथय जयसूर्या, निसाल परेरा, गनुका हेराथ, नुवान पुष्पकुमारा, सुरंगा विक्रमसिंघे. 

बदुला सी इगल्स(badulla sea eagles): परवेज महरूफ(कर्णधार), शेहान रणतुंगा, निलंका जयवर्धने, प्रदीप समरवीरा, चतुरंगा दिसानायके, लाहिरू उदेश, गायन लक्षण, नविंदा इमाल्का, समीरा थरंगा, चनाका मेंडिस, रोहण पथिर्णा, निरोशन चतुरंगा, यशंता मधुसंका, विश्वा करुणारत्ने, दसून शनाका.

वेलावया वायपर्स (wellawaya vipers): अजंथा मेंडिस(कर्णधार), रशमिना केसारा, लाहिरु मेदुवंथा, चथुरा मनरंगा, संदुन दुष्मंथा, चंदाना लकमल, अचिंथा इरांदा, आदित्य सिरीवर्धने, अनिंथ बंडासा, अकिला दुष्यंथा, अमिला सेनदीरा, अमिला तुसारा, अंजना लक्षण, पवन इदिरिसिंघ,गयान चतुरंगे

वेळापत्रक(schedulde)

तारीख                वेळ                     सामना

२९ जून       सकाळी ११ वाजता      मोनारगाला हॉर्नेट्स वि वेलावया वायपर्स
२९ जून       दुपारी २.३० वाजता     युनिलियन्स महियांगनया वि बदुला सी इगल्स
३० जून       सकाळी ११ वाजता      युनिलियन्स महियांगनया वि वेलावया वायपर्स
३० जून       दुपारी २.३० वाजता     मोनारगाला हॉर्नेट्स वि बदुला सी इगल्स
१ जुलै        सकाळी ११ वाजता      मोनारगाला हॉर्नेट्स वि युनिलियन्स महियांगनया
१ जुलै       दुपारी २.३० वाजता       वेलावया वायपर्स वि बदुला सी इगल्स
२ जुलै       सकाळी ११ वाजता       युनिलियन्स महियांगनया वि बदुला सी इगल्स
२ जुलै       दुपारी २.३० वाजता       मोनारगाला हॉर्नेट्स वि वेलावया वायपर्स
३ जुलै      सकाळी ११ वाजता        मोनारगाला हॉर्नेट्स वि बदुला सी इगल्स
३ जुलै      दुपारी २.३० वाजता       युनिलियन्स महियांगनया वि वेलावया वायपर्स
४ जुलै      सकाळी ११ वाजता       मोनारगाला हॉर्नेट्स वि युनिलियन्स महियांगनया
४ जुलै      दुपारी २.३० वाजता      वेलावया वायपर्स वि बदुला सी इगल्स
५ जुलै     सकाळी ११ वाजता       एलिमिनेटर सेकंड पोझिशन वि थर्ड पोझिशन
५ जुलै     दुपारी २.३० वाजता      फायनल फर्स्ट पोझिशन टीम वि एलिमिनेटर विजेता

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी