IND vs AUS: दुसऱ्या टी-२० आधी मोठी दुर्घटना, ४ रुग्णालयात दाखल

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 22, 2022 | 16:20 IST | टाइम्स नाऊ मराठी

Stampede in Hyderabad: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी तिकीटांची विक्री सुरू झाल्यानंतर हजारोंच्या संख्येने गर्दी झाली. यामुळे गदारोळ झाला आणि यात अनेक जण जखमी झाले. 

stampede in Hyderabad
दुसऱ्या टी-२० आधी मोठी दुर्घटना, ४ रुग्णालयात दाखल 
थोडं पण कामाचं
  • भारत-ऑस्ट्रेलिया दुसरा टी-२० सामना
  • हैदराबाद टी-२० च्या तिकीटासाठी एकच गर्दी
  • चेंगंराचेंगरी झाल्याने अनेक जखमी रुग्णालयात दाखल

मुंबई: भारत(india) आणि ऑस्ट्रेलिया(australia) यांच्यात सुरू असलेल्या तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. चाहतेही या दोन संघांदरम्यानचा सामना पाहण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत. पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाचा(team india) पराभव झाल्यानंतर भारतीय चाहते आता दुसऱ्या सामन्यात पराभवाचा वट्टा काढणार का याची आशा लावून आहेत. अशातच हैदराबादमध्ये(hyderabad) २५ सप्टेंबरला होणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाटी जेव्हा तिकीट विक्री सुरू झाली तेव्हा हजारोंच्या संख्येने गर्दी झाली आणि एकच चेंगराचेंगरी झाली. stampede in Hyderabad during t-20 match ticket selling

अधिक वाचा - वजन कमी करण्यासाठी करा घरच्या घरी करा हे सोपे उपाय

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने २५ सप्टेंबरला होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० सामन्यासाठी तिकीटांची विक्री सुरू केली तर चाहत्यांची एकच झुंबड उडाली. पाहता पाहता जिमखाना ग्राऊंडमध्ये गदारोळ झाला. पोलीस पथक तेथे तैनात होते मात्र प्रेक्षकांची इतकी गर्दी होती की त्यांनाही गर्दी आवरण्यासाठी प्रचंड कष्ट घ्यावे लागले. 

दरम्यान, वाढलेल्या गर्दीमुळे गोंधळ झाला आणि एकच चेंगराचेंगरी झाली. यात चार जण जखमी झाले. त्यांना तातडीने तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. लाठीचार्जही करावा लागला. यामुळे परिस्थिती काहीशी नियंत्रणात आली. 

अधिक वाचा - "..यापेक्षा वाईट काहीच असू शकत नाही"असं का म्हणाली गौरी खान?

पहिल्या कसोटीत भारताचा पराभव

मोहाली येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताला पराभव सहन करावा लागला.  टीम इंडियाने पहिल्यांदा फलंदाजी करत २०८ धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ७१ धावा केल्या तर केएल राहुलने ५५ आणि सूर्यकुमार यादने ४६ धावांची खेळी केली. २०९ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरललेला ऑस्ट्रेलियाच्या संघाने हे आव्हान १९.२  ओव्हरमध्ये ६ विकेटचे नुकसान करत पूर्ण केले. याविजयासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी