पहा Team India चा Instagram LIVE.. Dhoni ने 2 सेकंदात केला कॅमेरा बंद

MS Dhoni Live : विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत वेस्ट इंडिजविरुद्धच्या T20 मालिकेपूर्वी इंस्टाग्रामवर लाइव्ह आला. त्याच्यासोबत नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव होते. या लाईव्ह सेशनच्या व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. अनुभवी महेंद्रसिंग धोनीही काही काळ व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Star players of Team India including Dhoni were LIVE on Instagram, watch the VIDEO,
पहा Team India चा Instagram LIVE.. Dhoni ने 2 सेकंदात केल कॅमेरा बंद  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 मालिका खेळणार आहे
  • शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ३ सामन्यांची वनडे मालिका जिंकली
  • आता अनेक वरिष्ठ खेळाडू टी0 मालिकेसाठी टीम इंडियामध्ये परतणार आहेत

मुंबई : यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत पुन्हा एकदा मैदानात दिसण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता तो दोन्ही संघांमधील टी-२० मालिकेत नियमित कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. यापूर्वी पंतने आपल्या सहकारी खेळाडूंसोबत इंस्टाग्राम लाइव्हवर मस्ती केली होती. त्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी देखील यामध्ये काही काळ दिसत आहे. (Star players of Team India including Dhoni were LIVE on Instagram, watch the VIDEO,)

भारताचा माजी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीसोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतो. त्याची पत्नी साक्षीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अनेकदा फोटो किंवा व्हिडिओ पोस्ट केले जातात ज्यामध्ये तो देखील दिसतो. धोनी केवळ आयपीएलमध्ये खेळत असल्याची झलक त्याच्या चाहत्यांनाही हवी आहे. मंगळवारी रात्री ऋषभ पंत इंस्टाग्रामवर लाइव्ह आला तेव्हा धोनी काही क्षणांसाठीच दिसला.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यासाठी खेळाडूही कॅरेबियन दौऱ्यावर पोहोचले आहेत. मालिकेपूर्वी, पंत मंगळवारी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि युझवेंद्र चहलसह इंस्टाग्रामवर लाईव्ह आले. यादरम्यान साक्षी धोनीही सामील झाली, हाय-हॅलो केल्यानंतर तिने कॅमेरा धोनीकडे वळवला, तसा तो थोडा अस्वस्थ दिसत होता. धोनीने नमस्कारासाठी हात हलवला.

यादरम्यान पंत हसला आणि म्हणाला, थोडा वेळ त्याच्यावर कॅमेरा ठेवा. धोनीने हसत तो बंद केला आणि कॅमेरावरच हात ठेवला. यावेळी पंत म्हणाला, ‘हां भैया ने बालों में कलर लगाया है. दिख रहा है.’  या लाईव्ह सेशनची व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चहल जेव्हा या लाईव्हमध्ये येतो तेव्हा रोहितसह इतर खेळाडूही त्याची टिंगल करतात. 


लाईव्ह दरम्यान रोहितने चहलला विचारले की तो नाश्ता करायला का आला नाही. मग पंत आणि सूर्या दोघेही हसायला लागतात. रोहित त्यांना विचारतो की तुझा डोळा का सूजला आहे. सूर्यकुमार आणि चहलही आपापसात बोलताना दिसत आहेत. त्यानंतरच पंत स्वत: सांगतो की, या लाईव्हमध्ये कोणाला कसे जोडायचे किंवा कसे काढायचे हे त्याला माहीत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी