IPL 2023 । पंत ते बुमराह... आयपीएल सुरू होण्यापूर्वीच 'या' संघांना धक्का, जाणून घ्या कोणते खेळाडू बाहेर

IPL 2023 Updates : भारतीय टीमचे स्टार क्रिकेटर ऋषभ पंत हा अपघातात जखमी झाल्याने यंदा आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही, त्यामुळे डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार बनवण्यात आले आहे.

Star players out of series before IPL starts
IPL 2023 । पंत ते बुमराह... आयपीएल सुरू होण्यापूर्वीच 'या' संघांना धक्का, जाणून घ्या कोणते खेळाडू बाहेर   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • दिल्ली कॅपिटल्सने नवीन कर्णधाराची घोषणा
  • ऋषभ पंत आयपीएल 2023 मधून बाहेर
  • डेव्हिड वॉर्नरला जबाबदारी मिळाली

IPL 2023 Updates: IPL 2023 सुरू होण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत आणि प्रत्येकजण त्यांच्या आवडत्या संघाशी संबंधित प्रत्येक अपडेट पाहत आहे. मात्र, या वर्षाच्या सुरुवातीपूर्वीच अनेक खेळाडू आयपीएलमधून बाहेर पडल्याने अनेक संघांना मोठा धक्का बसला आहे. रस्ते अपघातात बळी पडलेला ऋषभ पंत यंदा खेळू शकणार नाही, त्यामुळे डेव्हिड वॉर्नरला दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार बनवण्यात आले आहे. (Star players out of series before IPL starts)

अधिक वाचा : Asia Cup: भारत, पाकिस्तान आणि UAE मध्ये नाही तर या देशात होऊ शकते आशिया चषक स्पर्धा

डेव्हिड वॉर्नर

डेव्हिड वॉर्नरने यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद भूषवले आहे पण आता तो ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करेल.

जसप्रीत बुमराह
मुंबई इंडियन्सचा वेगवान आणि विश्वासार्ह गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे IPL 2023 मधून बाहेर पडला आहे.

काइल जेमिसन
चेन्नई सुपर किंग्जचा काईल जेमसनही दुखापतीमुळे यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

अधिक वाचा : IND vs AUS : भारत सलग चौथ्यांदा जिंकला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी, WTC च्या फायनलमध्ये दाखल

विल जॅक्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा विल जॅक्स, ज्यांच्यावर संघांच्या नजरा होत्या, तोही आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

झ्ये रिचर्डसन
ऑस्ट्रेलियाचा झ्ये रिचर्डसन, जो यंदा मुंबई इंडियन्सकडून खेळणार होता, तोही आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

प्रसिध कृष्ण (आरआर)
राजस्थान रॉयल्सचा प्रसिद्ध कृष्णाही यंदा आयपीएल खेळत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी