ब्रिस्बेन: ऑस्ट्रेलियाचा (Australia) माजी कर्णधार (former captain) स्टीव्ह स्मिथवर (Steve Smith) भारताविरुद्धच्या (India) सिडनीतील (Sydney) तिसऱ्या कसोटीदरम्यान (test match) रिषभ पंतच्या (Rishabh Pant) फलंदाजीच्या गार्डवरील (batting guard) खुणा मिटवून फसवणूक (cheating) केल्याचा आरोप (allegation) लावण्यात आला होता. सोशल मीडियावर (social media) लोक त्याला अजूनही प्रचंड ट्रोल (trolling) करत आहेत. संघाचा कर्णधार (captain) टिम पेननेही (Tim Paine) स्मिथचा बचाव (defense) केला आहे. मात्र प्रकरण वाढत असल्याचे पाहून चौथ्या कसोटीच्या आधी स्मिथने स्वतः समोर येऊन यावर स्पष्टीकरण (explanation) दिले आहे.
सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवशी स्टीव्ह स्मिथ खेळपट्टीच्या आसपासच्या जागेत जमिनीवर आपले पाय घासताना दिसला होता. यावर त्याने असे म्हटले आहे की यावर अशा प्रतिक्रिया पाहून त्याला धक्का बसला आहे आणि यामुळे तो निराशही आहे. मी खेळादरम्यान अनेकदा असे करतो आणि आम्ही कुठे गोलंदाजी करत आहोत हे बघणे हा त्यामागचा उद्देश असतो. माझा उद्देश हा क्रीजचा मध्य तयार करण्याचा होता आणि फलंदाज कशी फलंदाजी करत आहे हे जाणून घेण्याचा होता.
कांगारूंच्या संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनीही याप्रकरणी असे म्हटले होते की या घटनेवरून लोक एका खेळाडूच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह लावत आहेत हे अतिशय वाईट आहे. स्टीव्ह स्मिथबाबत मी अशा फालतू गोष्टींवर विश्वास ठेवणार नाही. जे स्टीव्ह स्मिथला ओळखतात त्यांना ठाऊक आहे की तो मैदानात बऱ्याचदा असे करतो. त्यामुळे याप्रकरणाचा जोर पाहता आम्ही सर्व हसत आहोत. तो खेळपट्टीवर अनेकदा असे करतो.
लँगर असेही म्हणाले की जे कुणी हे करत आहे त्याची काहीतरी चूक होत आहे आणि चुकीच्या दिशेने तो जात आहे. त्यादिवशी विकेट सपाट होती आणि काँक्रीटसारखी होती. ती खराब करण्यासाठी आपल्याला 15 इंचांच्या स्पाईक्सची गरज लागेल. जेव्हापासून स्मिथ संघात परतला आहे तेव्हापासून त्याची वर्तणूक चांगलीच आहे. तो त्याच्या बॅटला बोलू देतो. इंग्लंडमध्ये त्याच्यावर टीकेची जी झोड उठली ती मी याआधी कधी पाहिलेली नव्हती, मात्र तेव्हाही तो सतत हसतमुख होता आणि त्याने उत्तर देण्याची संधी आपल्या बॅटलाच दिली.