सुनील गावस्कर यांच्यासोबत टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा हा प्लेअर सध्या लढतोय आयुष्याची कसोटी

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Mar 30, 2023 | 19:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sunil Gavaskar Opening Partner Sudhir Naik : भारताचे माजी क्रिकेटर सुधीर नाईक यांच्यावर सध्या मुंबईच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 78 वर्षीय सुधीर नाईक यांनी 1974 मध्ये भारतीय क्रिकेट टीममध्ये पदार्पण केले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई टीमने रणजीमध्ये सहभाग देखील घेतला होता.

Former India opener Sudhir Naik hospitalised
सुनील गावस्कर यांसोबत केले कसोटी सामन्यात पदार्पण  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सुनील गावस्कर यांच्यासोबत 1974 च्या टेस्ट मॅचमध्ये केले होते पदार्पण
  • भारताला वनडेमध्ये पहिला चौकार मिळवून देणारे प्लेअर
  • भारतासाठी झहीर खान आणि वसीम जाफर यासारखे स्टार क्रिकेटर तयार केले

Former India Opener Sudhir Naik भारताचे माजी क्रिकेटर सुधीर नाईक सध्या आयुष्याची कसोटी लढत आहेत. 1974 मध्ये भारतीय क्रिकेट टीममध्ये पदार्पण करणारे सुधीर नाईक गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबद्दलची माहिती सतीश शहा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटद्वारे दिली. (Sudhir Naik who opened the test with sunil gavaskar is hospitalized)

78 वर्षीय सुधीर यांनी भारतासाठी तीन टेस्ट मॅच आणि दोन वन-डे मॅचेस खेळल्या आहेत.

अधिक वाचा : ​राम नवमीच्या दिवशी भारतातील दोन मंदिरांमध्ये दुर्घटना

सुनील गावस्कर यांसोबत केले टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण

माजी क्रिकेटर सुधीर नाईक यांनी 1974 मध्ये इंग्लंडविरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या मॅचमध्ये भारताचे दिग्गज प्लेअर सुनील गावस्कर यांसोबत ते सलामीला उतरले होते. मात्र, या मॅचमध्ये त्यांना विशेष कामगिरी करता आली नाही. त्यावेळी त्यांनी 19 बॉलचा सामना करत अवघ्या 4 रन्स काढत पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले होते. त्यांच्या तुलनेत सुनील गावस्कर हे मॅचमध्ये खाते न उघडता परतले होते. मात्र, दुसऱ्या इनिंगमध्ये सुधीर नाईक यांनी तूफान बॅटिंग करत 165 बॉल्समध्ये 9 फोरच्या मदतीने 77 रन्स ठोकल्या होत्या. या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडने भारताचा एक डाव आणि 78 रन्सने पराभव केला होता. 

अधिक वाचा ​: 'या' 5 आयुर्वेदिक औषधी वनस्पती तुमची किडनी ठेवतात निरोगी

सुधीर यांनी अनेक प्लेअर्स तयार केले

सुधीर नाईक यांनी रणजी ट्रॉफीमध्ये बॉम्बे (मुंबई) टीमचे नेतृत्व केले आहे. याशिवाय ते नॅशनल क्रिकेट क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणूनही कार्यरत आहे. त्यांच्या प्रशिक्षणांतर्गत भारतासाठी झहीर खान आणि वसीम जाफर या सारखे स्टार क्रिकेटर आणि राजेश पवार, राजू सुतार यांसारखे वर्तमान काळातील अनेक प्लेअर्स तयार झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी