Team India T20 WC:टीम इंडियाचे हे खेळाडू घेणार निवृत्ती, सुनील गावस्करांचा मोठा दावा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 11, 2022 | 19:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

इंग्लंडविरुद्ध 10 विकेटनी पराभव पत्करल्यानंतर टीम इंडियाचा टी20 वर्ल्ड कप 2022मधील प्रवास संपुष्टात आला आहे. आता महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी भारतीय संघाबाबत मोठी बाब सांगितली आहे. 

sunil gavaskar
टीम इंडियाचे हे खेळाडू घेणार निवृत्ती, गावस्करांचा दावा 
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर आता क्रिकेट तज्ञ आपापल्या पद्धतीने खेळाडूंच्या कामगिरीबाबत विश्लेषण करत आहेत.
  • महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी बरंच काही म्हटलं आहे.
  • गावस्कर म्हणाले, येणाऱ्या दिवसांत काही वरिष्ठ खेळाडू टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात.

मुंबई: टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये() इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाला() 10 विकेटनी पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह टीम इंडियाचा() प्रवास खिताब जिंकल्याशिवायच संपला. अॅडलेडमध्ये गुरूवारी रंगलेल्या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला विजयासाठी 169 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान त्यांनी 16 ओव्हरमध्ये पूर्ण केले. आता फायनल सामन्यात 13 नोव्हेंबरला इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. sunil gavaskar big statement about retirement of team india cricketer

अधिक वाचा - 90 किलोच्या न्यूट्रिशनिस्टने घटवलं 30 किलो वजन

गावस्करने हार्दिकबाबत केले हे विधान

टीम इंडियाच्या लाजिरवाण्या पराभवानंतर आता क्रिकेट तज्ञ आपापल्या पद्धतीने खेळाडूंच्या कामगिरीबाबत विश्लेषण करत आहेत. महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी बरंच काही म्हटलं आहे. गावस्कर म्हणाले, येणाऱ्या दिवसांत काही वरिष्ठ खेळाडू टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. गावस्करांनी हाही दावा केला की हार्दिक पांड्या भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व करू शकेल. 

सुनील गावस्कर म्हणाले, कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच प्रयत्नात इंडियन प्रीमियर लीग जिंकल्याने त्यांनी पुढी कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याचे नाव ठरवले गेले असणार. हार्दिक पांड्या निश्चितपणे भविष्यात संघाची कमान सांभाळू शकतो. काही खेळाडू निवृत्ती होतील. खेळाडू याबाबत खूप विचार करत असतील. 30-40 या दरम्यान जे खेळाडू आहेत ते आपल्या भविष्याबाबत विचार करत असतील. 

वरिष्ठ खेळाडूंमध्ये विराट यशस्वी

टी20 वर्ल्ड कप 2022मध्ये भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंपैकी केवळ विराट कोहलीची चांगली कामगिरी झाली. विराट या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला मात्र बाकी वरिष्ठ खेळाडू रोहित शर्मा, रवीचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, दिनेश कार्तिक यांच्यासाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरली. या सर्व खेळाडूंचे वय आता 30-40 दरम्यान आहे. 

अधिक वाचा  - राठोडां सदर्भातला प्रश्न विचारातचं वाघ भडकल्या, म्हणाल्या...

असा होता भारत-इंग्लंड सामना

भारतीय संघाने टॉस हरत पहिल्यांदा बॅटिंग करताना 6 बाद 168 धावा केल्या. हार्दिकने 33 बॉलवर 63 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने 5 षटकार आणि 4 चौकार लगावले. तर कोहलीने 40 बॉलम्ये 50 धावा केल्या. इंग्लंडसाठी क्रिस जॉर्डनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने हे आव्हान 24 बॉल राखत पूर्ण केले. बटलरने  49  बॉलमध्ये नऊ चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 80 धावांची खेळी केली. तर अॅलेक्स हेल्सने 47 बॉलमध्ये नाबाद 86 धावा केल्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी