महान क्रिकेटरची भविष्यवाणी, इंग्लंडला टेस्ट सीरिजमध्ये ४-०ने मात देणार विराट ब्रिगेड

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jun 04, 2021 | 15:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

Sunil Gavaskar: या महान फलंदाजाला विश्वास आहे की विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आगामी इंग्लंड दौऱ्यात शानदार कामगिरी करेल. गावस्करने म्हटले की भारत टेस्टमध्ये बेस्ट असेल. 

team india
इंग्लंडला टेस्ट सीरिजमध्ये ४-०ने मात देणार विराट ब्रिगेड 

थोडं पण कामाचं

  • सुनील गावस्करने भारत कसोटी मालिका ४-० ने जिंकणार असल्याची भविष्यवाणी केली
  • गावस्करने म्हटले की भारतीय संघाकडे आक्रमक गोलंदाजी आहे
  • भारतीय संघ साऊथम्पटनला पोहोचला आहे आणि क्वारंटाईन आहे. 

मुंबई: भारताचा महान फलंदाज सुनील गावस्करचे(sunil gavaskar) म्हणणे आहे की इंग्लंडविरुद्धच्या(england) आगामी कसोटी मालिकेत(test series) विराट कोहलीचा संघ(virat kohli team) शानदर कामगिरी करेल. भारतीय संघ गुरुवारी युकेमध्ये पोहोचला आणि तेथे हा संघ क्वारंटाईन आहे. टीम इंडियाचा इंग्लंड दौऱ्याची सुरूवात न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसोबत करेल. यानंतर ते इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत. (sunil gavaskar says virat kohli team will win aginst england test series by 4-0 )

सुनील गावस्करचे म्हणणे आहे की इंग्लंडमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये भारतासारखा उन्हाळा असतो आणि याचा फायदा पाहुण्या संघाला होईल. गावस्करने ही भविष्यवाणी केली आहे. लिटिल मास्टरने द टेलिग्राफशी बोलताना सांगितले की इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिज डब्लूटीसी फायनलच्या ६ आठवड्यांहून अधिक काळानंतर ससुरू होईल. त्यामुळे एका सामन्याच्या निकालाने काही फरक पडणार नाही. भारत ही मालिका ४-०ने जिंकेल कारण सामने ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळवले जातील. 

इंग्लंडच्या स्थितीत ड्यूक फलंदाजांना फायदा मिळतो जे खूप मूव्ह होतात. भारताच्या माजी महान फलंदाजाने म्हटले की यात काहीच शंका नाही की इंग्लंड हिरवी विकेट तयार करेल. इंग्लंडने या वर्षी भारत दौऱ्यादरम्यान स्पिनसाठी मदत करणाऱ्या पिचबाबत नाराजी व्यक्त केली होती. भारताकडे चांगले गोलंदाजी आक्रमण आहे जे इंग्लिश फलंदाजांना त्रासदायक ठरू शकतात.

भारतीय संघ सध्या साऊथम्पटन येथील एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. येथे त्यांची पुन्हा चाचणी केली जाणार आहे. क्वारंटाईनदरम्यान खेळाडूंची नियमितपणे चाचणी केली जाईल. प्रत्येक राऊंडमध्ये निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना इतर मोकळीक दिली जाईल. न्यूझीलंडचा संघ सध्या इंग्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. ते १५ जूनला डब्लूटीसी फायनल बबलमध्ये येतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी