मुंबई: भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर(sunil gavaskar) यांनी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर(south africa tour) राहुलकडे नेतृत्व देण्याच्या निर्णयावर सवाल उपस्थित केले आहेत. के एल राहुलने(kl rahul) दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ज्या सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे त्या सर्व सामन्यांमध्ये भारताला वाईट पद्धतीने सामना करावा लागला. वनडे मालिकेत टीम इंडियाचे(team india) नेतृत्व लोकेश राहुलकडे होते, कारण रोहित शर्मा दुखापतग्रस्त होता. sunil gavaskar take a dig on kl rahul over performance as a captain
लोकेश राहुलच्या नेतृत्वात टीम इंडियाने इतक्या वाईट पद्धतीने खेळ केला की द.आफ्रिकेने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-०ने हरवले. याआधी द.आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभव पत्करावा लागला होता. गावस्करने लोकेश राहुलला कर्णधारपद दिल्याबद्दल टीम मॅनेजमेंटवर सवाल उपस्थित केले आहेत. कारण राहुलनेआतापर्यंत आपली राज्याची टीम कर्नाटकचेही नेतृत्व केले नव्हते.
सुनील गावस्कर यांनी इंडिया टुडेला सांगितले, लोकेश राहुलकडे जास्त नेतृत्वाचा अनुभव नाही. लोकेश राहुलने गेल्या २ आयपीएलमध्ये केवळ पंजाब किंग्सचे नेतृत्व केले आहे. जर आयपीएलमध्येही लोकेशचे नेतृत्व पाहिले तर पंजाब किंग्सने गेल्या दोन वर्षात काही खास कामगिरी केलेली नाही. राहुलने याआधी कधीही रणजी ट्रॉफी अथवा लिस्ट एमध्येही नेतृत्व केलेले नाही. यासाठी तुम्ही जर त्याला कर्णधाराच्या रूपात पाहता तेव्हा धैर्य ठेवण्याची गरज असते.
आता भारत ६ फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्ध घरच्या मैदानावर तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या वनडे आणि टी-२० मालिकेत कर्णधार म्हणून रोहित शर्माचे पुनरागमन होऊ शकते.