Sunil Gavaskar: टीम इंडियात विश्रांती घेणाऱ्या खेळाडूंवर भडकले सुनील गावस्कर

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 12, 2022 | 14:36 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारताची माजी क्रिकेटर सुनील गावस्करने वरिष्ठ खेळाडूंच्या टीम इंडियातील विश्रांती घेणाऱ्या खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे. तुम्ही जर भारतासाठी खेळत आहात तर तुम्ही विश्रांती घेण्याचा विचार कसा करू शकता. 

sunil gavaskar
टीम इंडियात विश्रांती घेणाऱ्या खेळाडूंवर भडकले सुनील गावस्कर 
थोडं पण कामाचं
  • द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निवड समितीने विराट कोहली(virat kohli), कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंना विश्रांती दिली होती.
  • आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याने नेतृत्व सांभाळले होते.
  • भारताचे महान खेळाडू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी यावरून सवाल उपस्थित केले आहेत. 

मुंबई: आयपीएलनंतर(ipl) भारतीय खेळाडू(indian cricketer) सातत्याने विश्रांती घेत आहे. द. आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत निवड समितीने विराट कोहली(virat kohli), कर्णधार रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहसारख्या खेळाडूंना विश्रांती दिली होती. तर आयर्लंड दौऱ्यावर हार्दिक पांड्याने नेतृत्व सांभाळले होते. भारतीय संघ सध्या बदलाच्या दौऱ्यातून जात आहे. आता भारताचे महान खेळाडू आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी यावरून सवाल उपस्थित केले आहेत. sunil gavaskar take a dig on team india players who take a rest

अधिक वाचा - RSS च्या कार्यालयावर बॉम्ब हल्ला, खिडकीच्या काचा फुटल्या

गावस्कर म्हणाले असं काही...

भारताचे महान खेळाडू सुनील गावस्कर यांनी एका कार्यक्रमादरम्यान  सांगितले की काही वरिष्ठ खेळाडूला भारतीय क्रिकेट संघाच्या इंटरनॅशनल कॅलेंडरदरम्यान आराम मिळतो. त्याने पुढे बोलताना सांगितले की, पाहा मी भारताच्या सामन्यांदरम्यान विश्रांती घेणाऱ्या खेळाडूंशी सहमत नाही. अजिबात नाही. तुम्ही भारतासाठी खेळत आहात. तुम्ही आयपीएलदरम्यान आराम करत नाही मात्र भारतासाठी खेळताना आराम करता. मी याच्याशी सहमत नाही. तुम्ही भारतासाठी खेळत आहात त्यामुळे तुम्ही आरामाची गोष्टच करू नका. 

कसोटी सामन्यांवर होतो परिणाम

सुनील गावस्करने पुढे बोलताना सांगितले की टी-२०मध्ये एका डावात केवळ २० ओव्हर असतात त्यामुळे तुमच्या शरीरावर काही परिणाम होत नाही. कसोटी सामन्यांमध्ये मेंदू आणि शरीर एक टोल घेतात मात्र टी-२० मध्ये क्रिकेट खेळण्यात कोणतीच समस्या नाही आहे. 

अधिक वाचा - हेल्दी ब्रेकाफास्टमुळे होईल वजन कमी, वाचा खास टिप्स

इंग्लंडविरुद्ध मिळाली होती विश्रांती

इंग्लंडविरुद्ध पहिल्या टी-२० सामन्यात अनेक स्टार खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती मात्र यानंतरही भारताने ही टी-२० मालिका २-१ अशी आपल्या नावे केली. वेस्ट इंडिजसाठी वनडे मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गज क्रिकेटर्सना आराम देण्यात आला होता. भारतीय संघ यावेळेस टी-२० वर्ल्डकप २०२२च्या तयारीत व्यस्त आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी