सुनिल शेट्टीचा जावाई होणार भारतीय क्रिकेट संघाचा हा खेळाडू

टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू केएल राहुल (KL Rahul) लवकरच लग्न करणार आहे. राहुल आणि आथिया शेट्टी  (Athiya Shetty) बऱ्याच काळापासून रिलेशशिपमध्ये आहेत. आथिया नुकतीच जर्मनीहून परतली आहे. तर राहुल त्याच्या सर्जरीसाठी जर्मनीत गेला होता. या सर्जरीमुळे तो दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरूद्धची सीरिज खेळू शकला नाही. तसेच आगामी आशिया कप स्पर्धेतही खेळण्याची शक्यता कमी आहे. 

Sunil Shetty's Javai Bapu will be a cricketer
सुनिल शेट्टींचा जावाई बापू होणार क्रिकेटपटू   |  फोटो सौजन्य: Times Now

मुंबई : टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू केएल राहुल (KL Rahul) लवकरच लग्न करणार आहे. राहुल आणि आथिया शेट्टी  (Athiya Shetty) बऱ्याच काळापासून रिलेशशिपमध्ये आहेत. आथिया नुकतीच जर्मनीहून परतली आहे. तर राहुल त्याच्या सर्जरीसाठी जर्मनीत गेला होता. या सर्जरीमुळे तो दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड विरूद्धची सीरिज खेळू शकला नाही. तसेच आगामी आशिया कप स्पर्धेतही खेळण्याची शक्यता कमी आहे. 

'इंडिया टुडे' नं दिलेल्या वृत्तानुसार राहुल आणि आथिया शेट्टी आगामी तीन महिन्यांमध्ये मुंबईत लग्न करू शकतात. आथिया शेट्टी ही चित्रपट अभिनेता सुनील शेट्टीची (Sunil Shetty) मुलगी आहे. राहुल आणि आथिया त्यांच्या कुटुंबासह नवं घर पाहायला गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या घराच्या रिनोवेशनचं काम सध्या वेगानं सुरू आहे. राहुलनं आयपीएल स्पर्धेत (IPL 2022) दमदार कामगिरी करत 600 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्याच्या कॅप्टनसीमध्ये लखनऊ सुपर जायंट्सनं 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला होता. 

Read Also : Guru purnima 2022 : गुरुपौर्णिमेला होत आहेत 4 राजयोग

आथियाची आजवरची चित्रपट कारकिर्द साधारण आहे. तिनं सलमान खान प्रोडक्शनच्या हिरो या सिनेमातून पदार्पण केलं. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकली नाही. त्यानंतर तिचा अर्जुन कपूरसोबत मुबारकां हा सिनेमा आला होता. तो सिनेमा देखील कमाल करू शकला नाही. केएल राहुल हा टीम इंडियाच्या बॅटींगचा प्रमुख आधारास्तंभ आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करणाऱ्या राहुलकडून आगामी टी20 वर्ल्ड कपमध्ये मोठी अपेक्षा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी