मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी खेळताना अनेक जबरदस्त खेळी करत देशाला सामने जिंकून दिलेत. तसेच आयपीएलमध्येही सुरेश रैना(suresh raina) चेन्नई सुपर किंग्सचा(chennai super kings) भाग होता. यावेळीही त्याने अनेक अविस्मरणीय खेळी खेळल्या आहेत. त्याच्या आयुष्यात आणखी एक सुंदर क्षण आला आहे. आता तो आपल्या नावाच्या आधी डॉक्टर(doctor) जोडणार आहे. रैनाला प्रसिद्ध वेल्स युनिर्व्हसिटीद्वारे(wales university) डॉक्टरेटची पदवी देण्यात आली आहे.
अधिक वाचा - FTII विद्यार्थ्याचा वसतिगृहाच्या खोलीत संशयास्पद मृत्यू
सुरेश रैनाला वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड एडवान्स्ड स्टीजकडून डॉक्टरेटची पदवी देण्यात आली आहे. या दरम्यान सुरेश रैनासह त्याचे कुटुंबीयही उपस्थित होते.
I am humbled to receive this honour from the outstanding institution VELS Institute of Science & technology & Advanced Studies @VelsVistas @IshariKGanesh Sir. I am moved by all the love & thank you from the bottom of my heart. Chennai is home & it has a special place for me ❤️✨ pic.twitter.com/bZenkMwid8 — Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) August 5, 2022
रैनाने ट्विटरवर या सोहळ्याचे फोटो पोस्ट करत लाहिले, मी वेल्स इन्स्टिट्यूट ऑफ साइंड अँड टेक्नॉलॉजी अँड अॅडव्हान्स स्टडीजकडून हा सन्मान मिळाल्याबद्दल खूप खुश आणि आभारी आहे. मला सर्वांकडून मिळत असलेल्या प्रेमाने खूप भावूक झालो आणि सर्वांचे मनापासून आभार मानतो. चेन्नई हे माझे घर आहे आणि ही जागा माझ्यासाठी खास राहिली आहे.
विशेष म्हणजे, आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना सुरेश रैनाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात अनेक अविस्मरणीय क्षण जगले होते. या दरम्यान त्याने अनेक रेकॉर्ड्सही बनवले. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. त्याने २०५ आयपीएल सामन्यांमध्ये ५५२८ धावा केल्यात.
सुरेश रैनाने २०५ आयपीएल सामन्यांत १३६.७३च्या स्ट्राईक रेटने एकूण ५५२८ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने १ शतक आणि ३९ अर्धशतके ठोकली आहेत. रैनाची आयपीएलमध्ये बेस्ट धावसंख्या १०० इतकी आहे. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये शतक लगावणारा रैना पहिला भारतीय आहे.
रैना आणि महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते. १५ ऑगस्ट २०२०ला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते. त्यानंतर काही वेळाने रैनानेही सोशल मीडियाच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली होती.