Suresh Raina : धोनीचा खास मित्र रैनाने सोडली माहीची साथ; जाणून घ्या काय आहे कारण?

csk released suresh raina | क्रिकेटच्या जगात अशी काही मैत्री किंवा काही जोडी असते जी नेहमी एकत्र राहते आणि त्यांच्या मैत्रीची चर्चा जगाच्या कानाकोपऱ्यात होते. अशीच एक जोडी म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैना यांची मैत्री. धोनी आणि रैना यांची जोडी मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील नेहमीच एकत्र दिसली आहे.

Suresh Raina will be not playing with m.s dhoni in upcoming ipl season
धोनीचा खास मित्र रैनाने सोडली माहीची साथ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या लिलावात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने रैनाला संघात रिटेन केले नव्हते.
  • रैना आता आगामी २०२२ च्या आयपीएल हंगामात अहमदाबाद संघाकडून खेळणार आहे.
  • रैना आता धोनीच्या नाही तर के.एल राहुलच्या नेतृत्वाखाली आयपीएल खेळणार आहे.

Suresh Raina Not part of CSK | नवी दिल्ली : ज्या प्रकारे शाहरुख खानचे बॉलिवूडच्या दुनियेत मोठे नाव आहे, त्याचप्रमाणे महेंद्रसिंग धोनीचे (M.S Dhoni) देखील क्रिकेटच्या विश्वात मोठे नाव आहे. त्यामुळे आजच्या घडीला सर्वजण माहीला ओळखतात. संपूर्ण भारतच नाही तर संपूर्ण जग धोनीला ओळखते. त्यामुळे धोनीचा चाहता वर्ग देखील कोटींच्या घरात आहे.

दरम्यान, क्रिकेटच्या जगात अशी काही मैत्री किंवा काही जोडी असते जी नेहमी एकत्र राहते आणि त्यांच्या मैत्रीची चर्चा जगाच्या कानाकोपऱ्यात होते. अशीच एक जोडी म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनी (Indian Cricket Team Star Player Mahendra Singh Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांची मैत्री. धोनी आणि रैना यांची जोडी मैदानावर आणि मैदानाबाहेर देखील नेहमीच एकत्र दिसली आहे. या दोघांनी मिळून भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, एवढेच नाही तर ते आयपीएलमध्येही (Indian Premier League) एकाच संघासोबत खेळतानाही पाहायला मिळाले आहेत. 

धोनी आणि रैना आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून खेळत आले आहेत. दोघांच्या शानदार खेळीच्या जोरावर संघाने अनेक सामने जिंकले आहेत. मात्र आगामी आयपीएलसाठी ही लोकप्रिय जोडी वेगळी होण्याची शक्यता आहे. अलीकडेच रैनाला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जमधून रिलीज केल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. माहितीनुसार, या दोघांमध्ये मतभेद झाले होते ज्यामुळे धोनीने रैनाला त्याच्या संघात रिटेन केले नाही.

धोनीच्या संघातून रैना बाहेर 

इंडियन प्रिमिअर लीग जगभरातील सर्वात लोकप्रिय लीग आहे. दरम्यान या लीगमधील सर्वात यशस्वी संघामधील एक म्हणून धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्या संघाची ओळख आहे. आयपीएलमध्ये या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आहे. मात्र सुरेश रैना देखील संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. कारण सुरेश रैनाने चेन्नई सुपर किंग्जमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली जवळपास संपूर्ण आयपीएल खेळली आहे. त्यामुळे धोनी आणि सुरेश रैनाच्या मैत्रीची देखील खूप चर्चा होत असते.

मात्र नुकत्याच झालेल्या आयपीएल संघाच्या लिलावात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने रैनाला संघात स्थान दिले नाही आणि त्याला कायम ठेवले नाही. रैनाच्या जागी संघाने जडेजाला मोठी रक्कम देऊन संघात कायम ठेवले आहे. त्यामुळे रैना आता आगामी हंगामात दुसऱ्या संघासोबत खेळताना दिसणार आहे आणि धोनीसोबत खेळण्याची शक्यता फार कमी वर्तवली जात आहे.

सुरेश रैना हे क्रिकेट जगतातील एक मोठे नाव आहे. तो आयपीएलमध्ये धोनीच्या संघासोबत खेळताना दिसायचा पण आता तो सीएसकेच्या संघात खेळणार नाही कारण यावेळी चेन्नई सुपर किंग्सने रैनाला रिटेन केले नाही. त्यामुळे तो खूप निराश असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र रैना आता आगामी २०२२ च्या आयपीएल हंगामात अहमदाबाद संघाकडून खेळणार आहे आणि या संघाचा कर्णधार के.एल राहुल आहे. त्यामुळे रैना आता धोनीच्या नाही तर राहुलच्या नेतृत्वाखाली आयपीएल खेळणार आहे.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी