बजरंगबलीचा मंत्र शेअर करत सुरैश रैनाकडून हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Apr 19, 2019 | 17:14 IST | टाइम्स नाऊ मराठी

आज १९ एप्रिलला देशभरात हनुमान जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. टीम इंडियाचा क्रिकेटपटू सुरेश रैना यानंही ट्विट करत सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Suresh Raina (File Photo)
बजरंगबलीचा मंत्र शेअर करत सुरैश रैनाकडून हनुमान जयंतीच्या शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: AP

मुंबई: हिंदू संस्कृतीमध्ये सर्वांचं आराध्य दैवत असलेल्या भगवान हनुमानाचा आज जन्मदिवस आहे. यंदा १९ एप्रिलला म्हणजे आज संपूर्ण देशात हनुमान जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त सर्व नागरिक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत आणि बजरंगबलीच्या भक्तीत लीन झाले आहेत. केवळ सामान्य लोकच नाही तर अनेक सेलिब्रेटीज हनुमान जयंतीच्या शुभेच्छा देत आहेत. क्रिकेटपटू सुरेश रैनाचं नाव आता यात सामिल झालंय.

टीम इंडियाचा क्रिकेटपटू सुरेश रैनानं ट्विटरवरून सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं आपल्या ट्विटर अकाऊंटवर बजरंगबलीचा महामंत्र शेअर करत शुभेच्छा दिल्या. आपल्या ट्विटमध्ये रैनानं ‘ॐ मनोजवंम् मारुततुल्यवेगंम् जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठम l वातात्मजं वानर यूथमुख्यं श्री राम दूतंम् शरणम प्रपद्ये ll श्री राम जय राम जय जय राम ll’ हा महामंत्र लिहून शुभेच्छा दिल्या.

सुरेश रैना सध्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून मॅच खेळत आहे. सनरायजर्स हैदराबाद विरुद्धच्या एका मॅचमध्ये रैनानं कॅप्टन्सी पण केली होती. आयपीएल १२च्या ३३ व्या मॅचमध्ये हैदराबादनं चैन्नईला ६ विकेट्सनी पराभूत केलं होतं. तेव्हा कॅप्टन असलेल्या सुरेश रैनानं ही मॅच म्हणजे आमच्या टीमचे डोळे उघडणारी मॅच झाल्याचं म्हटलं होतं.

आता इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्डकप २०१९मध्ये सुरेश रैनाची वर्णी लागली नाहीय. १५ जणांच्या टीममध्ये रैनाचा समावेश नाही.

पाहा सुरेश रैनाचं ट्विट:

Suresh Raina on Twitter

चैत्र शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. यावेळी हनुमान जयंती १९ एप्रिलला साजरी होतेय. या दिवशी भगवान शंकराच्या ११व्या रूद्रावतार म्हणजेच श्री हनुमानचा जन्म झाला होता. हनुमान जयंतीच्या दिवशी बजरंगबलीची केलेली आराधना ही विशेष फलदायी असल्याची मान्यता हिंदू धर्मात आहे.

राम भक्त हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी खास विडा तुम्ही अर्पण करू शकता. हनुमानाला बनारसी पान खूप प्रिय आहे. त्यामुळं हनुमान जयंतीला ते अर्पण करून देवाचे आशिर्वाद घेऊ शकता. शिवाय हनुमान जयंतीला संध्याकाळी केवडा किंवा गुलाबाची माळ आपण अर्पण करू शकतो. हे करणं शक्य नसेल तर भक्तीभावानं हनुमानाला हात जोडले तरीही तुम्हाला देवाचा आशिर्वाद मिळेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
बजरंगबलीचा मंत्र शेअर करत सुरैश रैनाकडून हनुमान जयंतीच्या शुभेच्छा Description: आज १९ एप्रिलला देशभरात हनुमान जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्त लोक एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. टीम इंडियाचा क्रिकेटपटू सुरेश रैना यानंही ट्विट करत सर्वांना हनुमान जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Loading...
Loading...
Loading...