IND vs SL : सूर्या म्हणजे विक्रम; सूर्यकुमारने तीनवेळा बनवले सर्वात वेगवान शतक

IND vs SL : राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium)झाला. या सैराष्ट्रात भारतीय संघाचा (Indian team) खेळाडू सूर्या चमकला. काल झालेल्या सामन्यात सूर्याने नवा विक्रम केला आहे.

Surya is equal to record
सूर्या म्हणजेच विक्रम; असं आहे टी20 मधील करिअर   |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील तिसरे शतक फक्त 45 चेंडूत पूर्ण केले.
  • सूर्यकुमारने 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या.
  • टी-20 करिअरमधील 1 हजार 500 धावांचा टप्पा पार केला.

राजकोट  :  भारताने (India)श्रीलंकेविरुद्धची 3 मॅचची टी 20 सीरिज 2-1 अशी जिंकली. तीन टी20 मालिकेतील तिसरा सामना हा राजकोट (Rajkot) येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Saurashtra Cricket Association Stadium)झाला. या सैराष्ट्रात भारतीय संघाचा (Indian team) खेळाडू सूर्या चमकला. काल झालेल्या सामन्यात सूर्याने नवा विक्रम केला आहे. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) मैदानावर उतरला म्हणजे कुठला तरी विक्रम करणारच हे समीकरण बनलं आहे. (Surya is equal to record; suryakumar made fastest century three time)

अधिक वाचा  :  आमदार कदम यांचा अपघात; घातपाताचा संशय

तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात सूर्यकुमारने जबरदस्त खेळी करत श्रीलंकेच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली.  2022 पासून सूर्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विश्वकपमध्ये विराट कोहलीनंतर टी-20 विश्वचषकात अधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत आणखी कोणाचा समावेश असेल तर तो म्हणजे सूर्यकुमार यादव आहे. सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील तिसरे शतक फक्त 45 चेंडूत पूर्ण केले.

राजकोटमधये झालेल्या सामन्यामध्ये सूर्यकुमारने 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. यात 9 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश होता. धावा बनवण्याचा त्याचा स्ट्राइक रेट हा 200च्या पुढे होता. सूर्यकुमारच्या या फलंदाजीमुळे भारताला 20 षटकात 228 धावांपर्यंत मजल मारता आली.

अधिक वाचा  :  उद्या मुंबई लोकल रेल्वेच्या या लाईन 'मेगाब्लॉक फ्री'

टी20 मध्ये तीन वेळा केलं सर्वात वेगवान शतक 

117 विरुद्ध इंग्लंड- 2022
112 नाबाद विरुद्ध श्रीलंका- 2023
111 नाबाद विरुद्ध न्यूझीलंड- 2022

117 इंग्लंडविरुद्ध - 2022

2022 मध्ये इंग्लंडविरुद्धात झालेल्या टी20 सामन्यात सूर्यकुमारने जबरदस्त खेळी केली होती. सूर्यकुमारने 117 धावांच्या खेळीत उत्कृष्ट फलंदाजीचे दर्शन घडवले. त्याने केवळ 55 चेंडूत 14 चौकार आणि 6 षटकारांसह 117 धावा केल्या होत्या. या काळात सूर्यकुमार यादवचा स्ट्राइक रेट 212.72 होता. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये शतक झळकावणारा तो टीम इंडियाचा पाचवा खेळाडू ठरला होता. 

अधिक वाचा  : चाणक्य नीति - या गोष्टींपासून रहा सावध, नाहीतर....

111 नाबाद न्यूझीलंडविरुद्ध - 2022

टी-20 मध्ये सूर्यकुमार यादवची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. श्रीलंकेविरुद्ध जोरदार खेळी  करत शतक ठोकणारा सूर्याने न्यूझीलंडच्या गोलंदाजांनाही असाच प्रकारे फटके मारले होते. हा सामना 2022 मध्ये झाला होता. या सामन्यात त्याने आंतरराष्ट्रीय T20मध्ये 1100 धावा पूर्ण केल्या होत्या. सूर्याने 49 चेंडूत शतक पूर्ण केले होते. 


112 नाबाद श्रीलंका विरुद्ध - 2023

 श्रीलंकेविरुद्धात झालेल्या तिसऱ्या टी20 च्या सामन्यात सूर्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरे शतक फक्त 45 चेंडूत पूर्ण केले. आपल्या हटके स्टाईलने फलंदाजी करण्यात माहीर असलेल्या सूर्यकुमारने 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. यात 9 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश आहे. 

सर्वात कमी चेंडूत 1500 धावा पूर्ण केल्या
 

सूर्याने या सामन्यात टी-20 करिअरमधील 1 हजार 500 धावांचा टप्पा पार केला. यासाठी त्याने 843 चेंडू घेतले. 45व्या सामन्याच्या 43व्या डावात त्याने ही कामगिरी केली. फक्त चेंडूंचा विचार करता 1 हजार 500 धावा करणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. इतर कोणत्याही खेळाडूला इतक्या वेगाने हा टप्पा गाठता आला नाही. सुमारे 178 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना सूर्याने ही धावसंख्या केली आहे.

भारतीय फलंदाजांमध्ये दुसरे स्थान

डावाच्या बाबतीत, सूर्यकुमार यादव हा विराट कोहली आणि केएल राहुलनंतर T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1500 धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.  हा आकडा गाठण्यासाठी विराट आणि केएल राहुल यांना 39-39 डाव खेळावे लागले तर सूर्याला 43 व्या डाव खेळावे लागेल. 

टी-20मध्ये भारताकडून सर्वात वेगवान शतक

रोहित शर्मा- 35 चेंडू विरुद्ध श्रीलंका
सूर्यकुमार यादव- 45 चेंडू विरुद्ध श्रीलंका
केएल राहुल- 46 चेंडू विरुद्ध वेस्ट इंडिज
सूर्यकुमार यादव- 48 चेंडू विरुद्ध इंग्लंड
सूर्यकुमार यादव- 49 चेंडू विरुद्ध न्यूझीलंड
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी