सूर्याला टी20मध्ये नंबर वन बनण्याची संधी, करावे लागेल हे काम...

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 21, 2022 | 15:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

न्यूझीलंडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या टी-20 सामना भारताचा या वर्षातील शेवटचा सामना असणार आहे. 

suryakuamar yadav
सूर्याला टी20मध्ये नंबर वन बनण्याची संधी, करावे लागेल हे काम 
थोडं पण कामाचं
  • टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मोहम्मद रिझवान सगळ्यात पुढे आहे.
  • त्याच्या नावावर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे
  • रिझवानने टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 2021 या वर्षात 1326 धावा केल्या होत्या. या

मुंबई: टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये(t20 international) नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादवने(surya kumar yadav) रविवारी न्यूझीलंडविरुद्ध(india vs new zealand) खेळवण्यात आलेल्या सामन्यात शानदार खेळी केली. त्याने या सामन्यात 51 बॉलमध्ये 111 धावा ठोकल्या. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्ध  192 धावांचे आव्हान दिले. सूर्याला त्याच्या या खेळीसाठी प्लेयर ऑफ दी अवॉर्ड देण्यात आला. न्यूझीलंडविरुद्ध खेळण्यात आलेल्या दमदार खेळीच्या जोरावर सूर्याने पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानच्या एका वर्ल्ड रेकॉर्डजवळ पोहोचला आहे. surya kumar has a chance to break world record

अधिक वाचा - श्रद्धा मर्डर केस प्रकरणी आफताबची नार्को टेस्ट होणार

काय आहे हा रेकॉर्ड

टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत मोहम्मद रिझवान सगळ्यात पुढे आहे. त्याच्या नावावर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. रिझवानने टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये 2021 या वर्षात 1326 धावा केल्या होत्या. या बाबतीत सूर्या दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2022मध्ये 188.37च्या स्ट्राईक रेटने 1151 धावा केल्या आहेत. रिझवानचा वर्ल्ड रेकॉर्डपासून सूर्यकुमार यादव 175 धावा मागे आहे. मात्र हा रेकॉर्ड तोडण्यासाठी सूर्याकडे केवळ एक इनिंग आहे. म्हणजेच सूर्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत आणि वर्षातील अंतिम टी-20 सामन्यात 175 धावांची विस्फोटक खेळी करावी लागेल. भारताला यानंतर यावर्षात केवळ वनडे आणि कसोटी सामने खेळायचे आहेत. 

सूर्याकडे शेवटची संधी

टी20 क्रिकेटमध्ये एका सामन्यात 175 धावा करणे अतिशय कठीण आहे मात्र अशक्य नाही. 2013मध्ये खेळवण्यात आलेल्या एका आयपीएल सामन्यादरम्यान क्रिस गेलने 175 धावा केल्या होत्या. क्रिस गेलचा हा रेकॉर्ड अद्याप कोणीही तोडू शकलेला नाही. मात्र सूर्या ज्या फॉर्ममध्ये आहे ते पाहता तो हा रेकॉर्ड तोडू शकतो. जर तो असे करण्यात यशस्वी ठरला तर एकाच सामन्यात तो दोन वर्ल्ड रेकॉर्ड मोडेल. सूर्याने या वर्षी टी-20 क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. सूर्याने या वर्षात दोन शतकेही ठोकली आहेत. तो कर्णधार रोहित शर्मानंतर एकमेव असा भारतीय आहे ज्याने एका वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये दोन शतके ठोकली आहेत. 

अधिक वाचा - मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचे आगमन, पुढील 12 दिवस थंडी जाणवणार

भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा पुढील सामना मंगळवारी 22 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मॅक्लीन पार्क नेपियरमध्ये खेळवला जाईल. भारत या मालिकेत 1-0ने पुढे आहे. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. या सामन्यात विजय मिळवत भारताच्या नजरा मालिका विजयावर असणार आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी