Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवची टी-२० रँकिंगमध्ये धूम, धोक्यात पाकिस्तानी खेळाडूचे स्थान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Sep 28, 2022 | 19:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

t20 ranking: वर्ल्ड टी-२० वर्ल्डकपूर्वी फलंदाजांचे रँकिंग जाहीर झाले आहे. याच इंडियन मिस्टर 360 सूर्याची धूम पाहायला मिळत आहे. 

suryakuamar yadav
Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादवची टी-२० रँकिंगमध्ये धूम 
थोडं पण कामाचं
  • सूर्यकुमारच्या हैदराबादमधील या दमदार खेळीमुळे भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी आपल्या नावे केली.
  • दरम्या याआधीही तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
  • त्याने ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर हे स्थान गाठले होते.

दुबई: भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादव(surya kumar yadav) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून(icc) बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या टी-२० आंतरराष्ट्रीय पुरुष रँकिंगमध्ये(t-20 ranking batting) फलंदाजांच्या यादीत पुन्हा एकदा करिअरमधील सर्वोत्कृष्ट दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध(australia) तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने ३६ बॉलमध्ये ६९ धावांची खेळी केली. या खेळीनंतर सूर्यकुमारच्या नावावर ८०१ रेटिंग अंक झाले आहेत. त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला(babar azam) दोन रेंटिंगने पछाडत दुसरे स्थान मिळवले आहे. surya kumar yadav career best rank in icc t-20 ranking

अधिक वाचा - तुळजाभवानी मातेच्या चरणी फुलांच्या सजावट, पाहा खास व्हिडीओ

सूर्यकुमारच्या हैदराबादमधील या दमदार खेळीमुळे भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ अशी आपल्या नावे केली. दरम्या याआधीही तो दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर हे स्थान गाठले होते. भारताचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या स्थानावर कायम आहे. तर माजी कर्णधार विराट कोहलीने रँकिंगमध्ये एका स्थानाने सुधारणा केली आहे.

रोहित १३व्या स्थानावर तर कोहली १५व्या स्थानावर आहे. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तीन डावांत अनुक्रमे ११, १४ आणि ६३ धावांची खेळी कली. या मालिकेत ५५, १० आणि एक धावाची खेळी करणारा भारताचा उप कर्णधार लोकेश राहुलला रँकिंगमध्ये चार स्थानांचे नुकसान झाले तो २२व्या स्थानावर घसरला. 

पाकिस्तानचा विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवानने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत जबरदस्त कामगिरीने ८६१ रेटिंहसह आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. गोलंदाजांमध्ये भारताचा स्पिनर अक्षऱ पटेल आणि युझवेंद्र चहल २६व्या तसेच वेगवान गोलंदाज हर्षल पेटल ३७वे स्थान यांच्या स्थानात सुधारणा झाली आहे. गोलंदाजांच्या रँकिंगचे नेतृत्व ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड करत आहे. भुवनेश्वर कुमारला यामध्ये नुकसान सोसावे लागले आणि तो १०व्या स्थानावर घसरला आहे. 

अधिक वाचा - करा या 5 मंत्रांचा जप, भासणार नाही पैशांची कमतरता

इतर फलंदाजांमध्ये मॅथ्यू वेड ६७व्या, कॅमरन ग्रीन ६७व्या आणि टीम डेविड १०९व्या स्थानावर आहे. ग्रीन आणि डेविडने भारताविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात अर्धशतक ठोकले होते. इंग्लडचा फलंदाज हॅरी ब्रूकने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ३१, नाबाद ८१ आणि ३४ धावांची खेळी केली. या आधारवर त्याच्या रँकिंगमध्ये ८ स्थानांनी सुधारणा झाली आहे. तो २९व्या स्थानावर आहे. टीममधील त्याचा सहकारी बेन डकेटने या तीन सामन्यात ४३, नाबाद ७० आणि ३३ धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याच्या रँकिंगमध्ये सुधारणा होत तो ३२व्या स्थानावर पोहोचला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी