Suryakumar Yadav Batting vs Zimbabwe: भारताचा (India) स्टार फलंदाज (batsman) सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. टी20 विश्वचषकाच्या स्पर्धेत सूर्यकुमार खूप धावा ठोकत आहे. आज झिम्बाब्वे संघाच्या विरुद्धात झालेल्या सामन्यात सूर्यकुमारने तुफानी खेळी करत अर्धशतक केलं आहे. यासह, त्याने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे, जो मिळविण्यासाठी सर्वात मोठे फलंदाज उत्सुक असतात.
ICC T20 क्रमवारीत सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावरील फलंदाज आहे. झिम्बाब्वेविरुद्ध त्याने धमाकेदार फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली. सूर्याने मैदानाच्या सर्व बाजुला फटके मारत धावा मिळवल्या. सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 61 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 4 चौकारचा समावेश आहे. यासह त्याने 2022 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण केल्या आहेत. T20 क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
2022 च्या T20 विश्वचषकात सूर्यकुमार यादवची बॅटमधून खूप धावा निघत आहेत. सूर्याकुमारने नेदरलँडविरुद्ध 51 धावा, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 68 धावा आणि आता झिम्बाब्वेविरुद्ध 61 धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने T20 विश्वचषक 2022 च्या 5 डावात 225 धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादव गेल्या एका वर्षात भारतासाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणारा सर्वात विश्वासार्ह फलंदाज ठरला आहे. जेव्हा तो आपल्या लयीत असतो तेव्हा तो कोणत्याही गोलंदाजीच्या आक्रमणाला सडेतोड उत्तर देऊ शकतो. तो लांब षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यंत भारतासाठी T20 क्रिकेटच्या 38 सामन्यांमध्ये 1209 धावा केल्या आहेत, ज्यात एका झंझावाती शतकाचा समावेश आहे.