INDvsENG 3rd T20, Suryakumar : सुर्यकुमार लढला पण भारत हरला

Suryakumar ton takes India close but England hold nerve in win : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ टी २० मॅचची सीरिज भारताने २-१ अशी जिंकली. सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला. इंग्लंडने तिसरी टी २० मॅच १७ धावांनी जिंकली.

Suryakumar ton takes India close but England hold nerve in win
सुर्यकुमार लढला पण भारत हरला  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • सुर्यकुमार लढला पण भारत हरला
  • भारताच्या १९८ धावांमध्ये सुर्यकुमारचे एकट्याचे ११७ धावांचे योगदान
  • इंग्लंडने तिसरी टी २० मॅच १७ धावांनी जिंकली, ३ टी २० मॅचची सीरिज भारताने २-१ अशी जिंकली

Suryakumar ton takes India close but England hold nerve in win : भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ टी २० मॅचची सीरिज भारताने २-१ अशी जिंकली. सीरिजच्या शेवटच्या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला. इंग्लंडने तिसरी टी २० मॅच १७ धावांनी जिंकली. या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला तरी क्रिकेटप्रेमींची मनं भारताच्या सुर्यकुमार यादवने जिंकली. भारताच्या १९८ धावांमध्ये सुर्यकुमारचे एकट्याचे ११७ धावांचे योगदान होते. 

सीरिजमधील तिसऱ्या आणि शेवटच्या मॅचमध्ये टॉस जिंकून इंग्लंडने बॅटिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडने २० ओव्हरमध्ये ७ बाद २१५ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारताने २० ओव्हरमध्ये ९ बाद १९८ धावा केल्या. सुर्यकुमार यादवने ५५ बॉल खेळून १४ फोर आणि ६ सिक्स मारत ११७ धावा केल्या. श्रेयस अय्यर वगळता कोणत्याही सहकाऱ्याची खंबीर साथ मिळाली नाही आणि सुर्यकुमारचे प्रयत्न अपुरे पडले. 

संक्षिप्त धावफलक :

इंग्लंड : २० ओव्हरमध्ये ७ बाद २१५ धावा. जेसन रॉय २७ धावा, जोस बटलर (कॅप्टन आणि विकेटकीपर) १८ धावा, डेव्हिड मालन ७७ धावा, फिलिप सॉल्ट ८ धावा, लियाम लिव्हिंगस्टोन नाबाद ४२ धावा, मोईन अली शून्य धावा, हॅरी ब्रूक १९ धावा, ख्रिस जॉर्डन धावचीत ११ धावा. अवांतर १३. भारताकडून रवी बिश्नोई आणि हर्षल पटेल प्रत्येकी २ तर आवेश खान आणि उमरान मलिक प्रत्येकी १ विकेट. 

भारत : २० ओव्हरमध्ये ९ बाद १९८ धावा. रोहित शर्मा (कॅप्टन) ११ धावा, रिषभ पंत (विकेटकीपर) १ धाव, विराट कोहली ११ धावा, सुर्यकुमार यादव ११७ धावा, श्रेयस अय्यर २८ धावा, दिनेश कार्तिक ६ धावा, रविंद्र जडेजा ७ धावा, हर्षल पटेल ५ धावा, आवेश खान नाबाद १ धाव, रवि बिश्नोई २ धावा. अवांतर ९. इंग्लंडकडून आर. टोप्ले ३ विकेट, ख्रिस जॉर्डन आणि डेव्हिड विली प्रत्येकी २ तर आर. ग्लेसन आणि मोईन अली प्रत्येकी १ विकेट.

मॅन ऑफ द मॅच : आर. टोप्ले, इंग्लंड
मॅन ऑफ द सीरिज : भुवनेश्वर कुमार, भारत

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी