Ind vs Nz 2nd T20 : अख्या डावात फक्त 1 चौकार मारला तरी सूर्यकुमार यादव ठरला 'प्लेयर ऑफ द मॅच', कसं काय बरं? जाणून घ्या

Suryakumar Yadav Player of the match:भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. लखनऊच्या (Lucknow) एकना स्टेडियमवर (Ekana Stadium)झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. टीम इंडियाने (Team India) आपल्या फिरकीपटूंच्या जोरावर त्यांना 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावांत रोखले होते.

How did Suryakumar get the Player of the match
सूर्यकुमार यादव Player of the match झालाचं कसा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
  • सूर्यकुमारला प्लेयर ऑफ द मॅच घोषित करण्यात आले.
  • सूर्याने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात संथ खेळी केली

Suryakumar Yadav Player of the match: भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यातील तीन (T-20) मालिकेतील दुसरा सामना (match) भारताने जिंकला. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. लखनऊच्या (Lucknow) एकना स्टेडियमवर (Ekana Stadium)झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. टीम इंडियाने (Team India) आपल्या फिरकीपटूंच्या जोरावर त्यांना 20 षटकांत आठ गडी गमावून 99 धावांत रोखले होते. परंतु भारताला हे मोजक्या शंभर धावांचे आव्हान पार करण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागली.( Suryakumar Yadav became 'Player of the Match' even he hit only 1 boundary in the entire innings) 

अधिक वाचा  : मध्य महाराष्ट्रसह मराठवाड्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता

या सामन्यात सूर्यकुमारला प्लेयर ऑफ द मॅच घोषित करण्यात आले. परंतु एकच चौकार सूर्यकुमारने मारला शिवाय स्ट्राइक रेटही शंभरच्या आत होते, तरीही त्याला प्लेयर ऑफ द मॅच का देण्यात आले हा प्रश्न अनेकांना पडला. याचं उत्तर आपण जाणून घेऊ. 

भारत आणि न्यूझीलंडचा दुसरा टी20 सामना अवघ्या काही षटकात संपणारा सामना होते पण तो अखेरच्या षटकापर्यंत चालला.  सुरुवातीला भारतीय संघाला न्यूझीलंडने दिलेले आव्हान सोपे वाटत होते, परंतु फलंदाजीला आल्यानंतर भारतीय संघ चांगलाच अडचणीत आला. टीम इंडियाने या लक्ष्याचा पाठलाग करायला सुरुवात केली तेव्हा त्यांच्या अडचणी वाढतच गेल्या. याचा परिणाम असा झाला की भारताने हे लक्ष्य एक चेंडू आधी गाठले. 

अधिक वाचा  : राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान

दरम्यान सूर्यकुमार यादवने यात महत्त्वाची भूमिका बजावली. सूर्याने 360-डिग्री अवतार धारण करून मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात चौकार आणि षटकार मारावेत असे चाहत्यांना वाटले मात्र सूर्यकुमारला न्यूझीलंडच्या गोलंदाजांना उत्तर देणं  अवघड झालं होतं. सूर्याने अवघ्या 26 धावा केल्या यात एका चौकारचा समावेश आहे. इतका कमी स्कोअर केला असता त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

अधिक वाचा  : महात्मा गांधींचे हे विचार तुमच्या आयुष्याला देतील नवी दिशा

हे झालं कसं 

टी-20 क्रिकेटचा नंबर वन फलंदाज सूर्यकुमार यादवने लखनऊमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 31 चेंडूत फक्त 26 धावा केल्या.  या खेळीसाठी सूर्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसे घडले? दरम्यान भारतासमोर केवळ 100 धावांचे लक्ष्य होते, परंतु ते साध्य करताना भारताची दमछाक झाली. 

अधिक वाचा  : महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त इमेजद्वारे करा अभिवादन

या खेळपट्टीवरून न्यूझीलंडच्या फिरकीपटूंना भारतापेक्षा जास्त मदत मिळत होती आणि चेंडू असे वळण घेत होते की फलंदाज खेळू शकत नव्हते. सूर्यकुमार यादवलाही त्याचे शॉट्स खेळता आले नाहीत. त्यामुळे त्याने वेगळा मार्ग स्वीकारला.  सूर्यकुमार यादव यांचा वेगळा अवतार पाहायला मिळाला. त्याने स्ट्राईक रोटेट करण्यास सुरुवात केली, जेणेकरून एक-दोन धावांच्या जोरावर लक्ष्य गाठता आले. यात तो सक्षमही होता.

अवघ्या एका चौकाराच्या जोरावर त्याने 26 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात सूर्याकुमारचा वेगळं रुप दिसल्याने त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.  सूर्याने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात संथ खेळी खेळत संघाला विजय मिळवून दिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी