IND vs WI:दुसऱ्या वनडेसह या खेळाडूचे करिअरही संपले! 

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jul 25, 2022 | 17:41 IST | टाइम्स नाऊ मराठी

Team india: भारतीय क्रिकेट संघ वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील दोन सामन्यांता टीम इंडियाचा एक खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरलाय. 

india vs west indies
IND vs WI:दुसऱ्या वनडेसह या खेळाडूचे करिअरही संपले!  
थोडं पण कामाचं
  • टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्य कुमार यादवने जितका शानदार खेळ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दाखवला तितकाच फ्लॉप तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात ठरत आहे.
  • दुसऱ्या वनडेत सूर्यकुमार यादवला केवळ ९ धावा करता आल्या.
  • वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात सूर्यकुमार यादव पूर्णपणे फ्लॉपठरला.

मुंबई: भारतीय क्रिकेट संघ(Indian cricket team) वेस्ट इंडिजविरुद्धच्या(west indies) ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत २-०ने आघाडीवर आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने(team india) ३ धावांनी विजय मिळवला होता. पहिल्या सामन्यात फ्लॉप राहिलेल्या खेळाडूंना कर्णधार शिखर धवनने(captain shikhar dhawan) बाहेर केले नाही. त्यांना दुसऱ्या वनडे सामन्यातही संधी देण्यात आली. एकीकडे काही खेळाडूंचे प्रदर्शन चांगले राहिले मात्र एक खेळाडू असा होता जो दीर्घकाळापासून फ्लॉप राहिला आहे. suryakumar yadav flop in against west indies matches

अधिक वाचा - राष्ट्रवादीत राजकीय भूकंप होणार? अजित पवारांनी म्हटलं...

सातत्याने फ्लॉप होतोय हा खेळाडू

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्य कुमार यादवने जितका शानदार खेळ इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत दाखवला तितकाच फ्लॉप तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सामन्यात ठरत आहे. आधी इंग्लंड आणि आता वेस्ट इंडिजविरुद्ध सूर्यकुमार यादवची कामगिरी सातत्याने खराब हो आहे. दुसऱ्या वनडेत सूर्यकुमार यादवला केवळ ९ धावा करता आल्या. त्याच्यामुळे संघाल एक विकेट लवकर गमवावी लागली. याशिवाय टीमची मधली फळी पुन्हा कमकुवत दिसली. 

पहिल्या वनडेतही ठरला फ्लॉप

वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात सूर्यकुमार यादव पूर्णपणे फ्लॉपठरला. त्याच्या बॅटमधून धावा निघणे कठीण झाले होते. एकीकडे भारताची टॉप ऑर्डर खूप धावा करत होती तेव्हा सूर्यकुमार धावा काढण्यासाठी तरसत होता. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने १४ बॉलमध्ये १३ धावा केल्या. तर टीम इंडियाची मिडल ऑर्डर कमकुवत दिसली. 

अधिक वाचा - बडीशेप खाल्ल्यामुळे सुधारेल लैंगिक आरोग्य

वनडेत फ्लॉप तर टी-२० क्रिकेटमध्ये हिट

सूर्यकुमार यादव जिथे वनडेत फ्लॉप होत आहे तर इंग्लंड दौऱ्यावर टी-२० क्रिकेटमध्ये तुफानी शतक ठोकत संघाला विजय मिळवून दिला होता मात्र वेस्ट इंडिजविरुद्द पहिल्या वनडे सामन्यात तो व्हिलन ठरला. अशातच तिसऱ्या सामन्यात कर्णधार शिखर धवन त्याला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी