suryakumar yadav: सूर्याची मोठी झेप, मिळवले हे स्थान

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Nov 02, 2022 | 17:02 IST | टाइम्स नाऊ मराठी

ICC T20 Rankings:भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव गेल्या काही काळापासून शानदार फॉर्मच्या जोरावर बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या ताज्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. 

suryakuamar yadav
suryakumar yadav: सूर्याची मोठी झेप, मिळवले हे स्थान 
थोडं पण कामाचं
  • गेल्या वर्षी मार्चमध्ये टी20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सूर्यकुमार यादवने भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे
  • याशिवाय त्याने वर्ल्ड क्रिकेटमध्ये ओळख बनवली आहे.
  • त्याने क्रिकेटच्या सर्व छोट्या फॉरमॅटमध्ये एक सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून समोर आला आहे. 

मुंबई: भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव(suryakumar yadav) गेल्या काही काळापासून जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने अनेक जबरदस्त खेळी करत भारताला सामने जिंकून देण्यात मोलाची मदत केली आहे. बुधवारी आयसीसीने(icc) ताजी टी20 रँकिंग(t20 ranking) जाहीर केली. या रँकिंगनुसार तो जगातील नंबर वन फलंदाज बनला आहे. सूर्यकुमारने पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज मोहम्मद रिझवानला मागे टाकले आहे. तो दुसरा भारतीय फलंदाज आहे जो टी20 आंतरराष्ट्रीय रँकिंगमध्ये टॉपवर पोहोचला आहे. suryakumar yadav top 1 in icc t20 ranking 

अधिक वाचा - पारदर्शक नोरानं इंटरनेट युझर्सचा वाढवला पारा

सूर्यकुमार यादवने रचला इतिहास

गेल्या वर्षी मार्चमध्ये टी20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर सूर्यकुमार यादवने भारतीय संघात आपले स्थान पक्के केले आहे. याशिवाय त्याने वर्ल्ड क्रिकेटमध्ये ओळख बनवली आहे. त्याने क्रिकेटच्या सर्व छोट्या फॉरमॅटमध्ये एक सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून समोर आला आहे. 

टी 20 रँकिंगमध्ये बनला जगातील नंबर 1 फलंदाज

सूर्यकुमारने भारतासाठी 37 टी20 सामने खेळताना एक शतक आणि 11 अर्धशतके ठोकली आहेत. त्याने 13 वनड आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्येही भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सूर्यकुमारचे 863 तर रिझवानचे 842 अंक आहेत. न्यूझीलंडा कॉनवे 792 अंकांसह टॉप3 मध्ये सामील आहे. 

बांगलादेशविरुद्ध 30 धावांची खेळी

सूर्यकुमारने बांगलादेशविरुद्ध 30 धावांची खेळी केली आहे. त्याने 16 बॉलमध्ये 30 धावा ठोकल्या. यात त्याने चार चौकार ठोकले. त्याने कोहलीसोबत चांगली भागीदारी केली. याआधी आफ्रिकेविरुद्ध त्याने 68 धावांची खेळी केली होती. त्याने 40 बॉलमध्ये 6 फोर आणि 3 सिक्स ठोकताना 68 धावा केल्या आहेत. 

कोहलीने रचला इतिहास

भारताचा किंग कोहलीने बांगलादेशविरुद्ध जबरदस्त खेळी करताना मोठा इतिहास रचला आहे. विराट कोहली टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने लंकेच्या महेला जयवर्धनेलाही मागे टाकले आहे. 

अधिक वाचा - पारदर्शक नोरानं इंटरनेट युझर्सचा वाढवला पारा

भारत दुसऱ्या स्थानावर

भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करण्यासाठी बांगलादेशला हरवणे गरजेचे आहे. संघाचे सर्व 3 सामन्यात 4 अंक आहेत आणि तर सुपर 12 राऊंडमधील ग्रुप2च्या अंकतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. शाकिब अल हसनच्या नेतृत्वातील बांगलादेश संघाचे तितकेच गुण आहेत. मात्र भारताचा रनरेट चांगला आहे. ग्रुप 2मध्ये बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे तर झिम्बाब्वे 3 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचे 2 अंक झालेत तर नेदरलँड्सने अद्याप खाते खोललेले नाही. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी