मुंबई: ७ जुलैला भारताचा माजी कॅप्टनकूल महेंद्रसिंग धोनी(ms dhoni) आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलीवूडमध्ये २०१६ साली त्याचा बायोपिक एम एस धोनी; द अनटोल्ड स्टोरी(ms dhoni the ultold story) हा सिनेमा रिलीज झाला होता. यात दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतने त्याची भूमिका साकारली होती. हा सिनेमा सुशांतच्या करिअरमधील सर्वात खास सिनेमा होता आणि त्याने या सिनेमासाठी दिवसरात्र मेहनत केली होती. भलेही या सिनेमासाठी त्याला कोणता मोठा अवॉर्ड मिळाला नाही मात्र समीक्षकांनी या सिनेमाचे कौतुक केले होते. बॉक्स ऑफिसवर २२० कोटींचा कलेक्शन करणारा हा सिनेमा २०१६मधील सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा होता. sushant singh rajput ask 250 questions to dhoni for his film
अधिक वाचा - अंघोळीसाठी गेलेले दोन तरूण बुडाले, एकाचा मृतदेह हाती
सिनेमाची शूटिंग सुरू होण्याआधी सुशांतने धोनीचे अनेक व्हिडिओज पाहिले. यानंतर या सिनेमाच्या निमित्ताने तो तीन वेळा धोनीला भेटला. सुशांतने स्वत: एका मुलाखतीत सांगितले होते की, मी सुरूवातीचे अनेक तास त्याला पाहिले. गोष्टी पिकअप करण्याची माझी योजना होती. मला शूटिंगदरम्यान त्याच्याबद्दल विचार करायचा नव्हता. १२ महिन्यांच्या तयारीत मी तीन वेळा धोनीची भेट घेतली. पहिल्यांदा मी धोनीला केवळ त्याची कहाणी ऐकवण्यास सांगितली. दुसऱ्यांदा माझ्याकडे २५० हायपोथेटिकल मल्टिपल चॉईस प्रश्न होते. तिसऱ्यांदा मी त्याला स्क्रिप्टबाबत सवाल केले. जसे की तु आता यावेळेस काय विचार करत आहे? हे बघण्यासाठी की मी योग्य दिशेला जात आहे की नाही.
सुशांत सिंह राजपूतने मेंटली तर धोनीला समजून घेतले आता वेळ होती त्याला फिजीकली दाखवण्याची त्यासाठी त्याला खूप मेहनत घ्यावी लागली. यासाठी त्याने माजी क्रिकेटर किरण मोरेकडून १३ महिन्यांची ट्रेनिंग घेतली. किरण यांनी त्याला विकेटकीपींगपासून ते फलंदाजी करण्यापर्यंतच्या पद्धती शिकवल्या. एका व्हिडिओ अॅनालिस्टने त्याला धोनीच्या प्रत्येक शॉटचे बारकावे समजावले ज्यामुळे एखादा बॉल कसा खेळावा हे सुशांतला समजेल. त्यानंतर बॉलिंग मशीनच्या मदतीने सुशांतला बॉलिंग केली. या दरम्यान एक दिवस तो साधारण ३०० बॉलवर हेलिकॉप्टर शॉटची प्रॅक्टिस करत होता. असे त्याने ९० दिवस केले. या दरम्यान त्याला अनेकदा त्रास तसेच दुखापती झाल्या. मात्र त्यानंतरही मैदानावर त्याचा सराव सुरू होता. हेलिकॉप्टर शॉटमधील त्याचे परफेक्शन पाहून धोनीने इतकंही म्हटलं होत की तो रणजीही खेळू शकतो.
सिनेमात सुशांतचा मित्र चिट्टूची भूमिका साकारणार अभिनेता आलोक पांडेने सांगितले की आम्ही लोक या सिनेमासाठी सुशांतचे डेडिकेशनपाहून थक्क झालो हेोतो. तो आम्हाला अनेकदा सांगत असे की त्याच्यासाठी ही भूमिका किती महत्त्वाची आहे. आम्हीही त्याची मेहनत बघून थक्क होत असू. त्याने या पद्धतीने स्वत:ला या कॅरेक्टरसाठी तयार केले होते. त्यामुळे अनेकदा आम्ही धोनीसोबतच शूटिंग करतोय की काय असे वाटत असे.
सुशांतने आणखी एका मुलाखतीत सांगितले होते की त्याचा अप्रोच धोनीला कॉपी करणे नव्हे तर त्याच्यापद्धतीने जीवन जगणे होते. त्याने मेंटली आणि फिजीकल स्वत:ला तयार केले आणि त्यानंतर स्वत:ला धोनी समजून त्याने संपूर्ण सिनेमाची शूटिंग केली. बाकी अनेक गोष्टी सुशांतशी मेळ खात होत्या त्या म्हणजे दोघेही बिहारचे आहेत यासाठी धोनीच्या बोलण्याची स्टाईल अथा लहेजा शिकण्यास त्याला खूप मेहनत करावी लागली नाही.. याशिवाय सुशांत एकेकाळी चांगला स्पोर्ट्सपर्सन होता.
अधिक वाचा - रेल्वेत चोऱ्या करणाऱ्या चार तरुणींना अटक
फार कमी लोक जाणतात की जेव्हा धोनीला विचारण्यात आले की त्याला आपल्या बायोपिकमध्ये कोणत्या अभिनेत्याला पाहायचे आहे तेव्हा त्याने सुशांतचे नाव घेतले होते. यामागे दोन कारणे होती एक तर माहीने सुशांतला काय पो छे सिनेमात क्रिकेट खेळताना पाहिले होते. दुसरे म्हणजे तोही बिहारचा आहे हे माहीत आहे. याशिवाय एखाद्या सुपरस्टारने आपली भूमिका साकारावी अशी धोनीची इच्छा नव्हती.