सुशील कुमारसाठी स्वतंत्र कोठडीची मागणी

सुशीलला आणखी ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याची मागणी दिल्ली पोलिसांनी केली तर सुशीलच्या वकिलाने या मागणीला विरोध केला.

Sushil Kumar produced in court; Delhi Police seeks 3-day custody of two-time Olympic medallist
सुशील कुमारसाठी स्वतंत्र कोठडीची मागणी 

थोडं पण कामाचं

  • सुशील कुमारसाठी स्वतंत्र कोठडीची मागणी
  • सुशीलच्या जीवाला धोका असल्याचा त्याच्या वकिलाचा दावा
  • सुशील अट्टल गुन्हेगार नाही तर परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेला असल्याचा त्याच्या वकिलाचा दावा

नवी दिल्ली: छत्रसाल स्टेडियममध्ये २३ वर्षांच्या कुस्तीपटू सागर राणा याला बेदम मारहाण करुन त्याची हत्या केल्याप्रकरणी सुशील कुमार दिल्ली पोलिसांच्या कोठडीत आहे. त्याच्या कोठडीची मुदत आणखी तीन दिवसांनी वाढवून मागण्यासाठी दिल्ली पोलिसांनी रोहिणी कोर्टात अर्ज केला. सुशीलला कोर्टासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी सुशीलच्या वकिलाने दिल्ली पोलिसांच्या मागणीला विरोध केला. Sushil Kumar produced in court; Delhi Police seeks 3-day custody of two-time Olympic medallist

दिल्ली पोलिसांचे वकील अतुल श्रीवास्तव यांनी सुशीलला आणखी तीन दिवस पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी केली. सुशीलने गुन्ह्याच्या ठिकाणी वापरलेले कपडे शोधण्यासाठी तसेच तो हरिद्वारमध्ये जिथे लपला होता त्या ठिकाणी चौकशी करण्यासाठी आणखी वेळ हवा असल्याचे अतुल श्रीवास्तव म्हणाले.

पोलिसांच्या मागणीला सुशीलचे वकील प्रदीप राणा यांनी विरोध केला. दिल्ली पोलिसांना चौकशीसाठी पुरेसा वेळ दिला आहे. आता सुशीलच्या जीवाला असलेला धोका लक्षात घेता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत व्हायला हवी. तसेच त्याच्यासाठी स्वतंत्र कोठडीची व्यवस्था हवी. सुशीलच्या जीवाला गुन्हेगारी टोळ्यांकडून धोका आहे; असे प्रदीप राणा म्हणाले. दिल्ली पोलीस दहा दिवसांपासून सुशीलची चौकशी करत आहेत. आता पोलीस कोठडीत वाढ करायची असेल तर दिल्ली पोलिसांनी ठोस कारण देणे आवश्यक आहे, असेही प्रदीप राणा म्हणाले. पोलीस डायरीतील नोंदींनुसार ११ पैकी ९ आरोपी अटकेत आहेत. अनेक आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत; हा मुद्दा त्यांनी कोर्टासमोर मांडला. 

सुशील कुमार भारतासाठी खेळला आहे. त्याने ऑलिंपिकमध्ये भारताला दोनदा पदक मिळवून दिले आहे. त्याला राजीव गांधी खेलरत्न आणि पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. तो अट्टल गुन्हेगार नाही तर परिस्थितीमुळे अडचणीत सापडलेला आहे; असा युक्तीवाद प्रदीप राणा यांनी रोहिणी कोर्टात केला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी