IPL 2023 Match 1, CSK vs GT : गतवर्षीची चॅम्पियन टीम गुजरात टायटन्स हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या सिझनचा पहिला सामना कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध खेळणार आहे. मात्र, या सिझनचा पहिला सामना सुरू होण्यापूर्वी धोनीच्या दुखापतीमुळे चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत. (Suspense on injured MS Dhoni playing against Gujarat)
41 वर्षीय एमएस धोनीच्या चेन्नईमध्ये सराव सत्रादरम्यान त्याच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली. गुरुवारी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सराव करताना त्याने फलंदाजी केली नाही.
गुजरात टायटन्स - हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, कोना भारत, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, राहुल तेवतिया, अभिनव मनोहर, मोहम्मद शमी, प्रदीप सांगवान, आर साई किशोर, विजय शंकर, साई सुदर्शन, राशिद खान, शिवम मावी, मॅथ्यू वेड, ओडियन स्मिथ, उर्विल पटेल, दर्शन नळकांडे, डेव्हिड मिलर (पहिल्या 2 सामन्यासाठी अनुपलब्ध), जोश लिटल (पहिल्या सामन्यासाठी अनुपलब्ध), यश दयाल, जयंत यादव, नूर अहमद, अल्झारी जोसेफ.
अधिक वाचा : IPL 2023 । काय आहे 'इम्पॅक्ट प्लेयर' नियम? आईपीएलमध्ये टीम कशा करतील त्याचा वापर
चेन्नई सुपर किंग्ज - महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, मोईन अली, बेन स्टोक्स, रवींद्र जडेजा, अजिंक्य रहाणे, सिसांडा मगाला, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, ड्वेन प्रिटोरियस, अह्या मंडल, निशांत सिंधू. राजवर्धन हंगेरगेकर, मिचेल सँटनर, सुभ्रांशु सेनापती, सिमरजीत सिंग, मथिसा पाथिराना, महेश टीक्षाना, भगत वर्मा, प्रशांत सोळंकी, शेख रशीद, तुषार देशपांडे.