Abu Dhabi T10 League 2021: टी१० लीगमध्ये ख्रिस गेलसह या ५ खेळाडूंवर असेल नजर, एका भारतीयाचा समावेश

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 27, 2021 | 12:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

भारताकडून ४९ वर्षीय स्पिनर प्रवीण तांबे चॅम्पियन मराठा अरेबियन्सकडून खेळणार. प्रवीण टी-१० लीगमध्ये हॅटट्रिक घेतली आहे. 

cricket
टी१० लीगमध्ये ख्रिस गेलसह या ५ खेळाडूंवर असेल नजर 

थोडं पण कामाचं

  • ख्रिस गेल या टी १० लीगमध्ये अबू धाबी संघाकडून खेळताना दिसणार आहे.
  • सडेतोड फलंदाजी आणि आपल्या लेग स्पिन गोलंदाजीच्या जोरावर आफ्रीदी विरोधी संघाला नामोहरम करू शकतो.
  • स्पर्धेत भारताकडून प्रवीण तांबे(Pravin tambe)खेळताना दिसणार आहे

नवी दिल्ली: अबूधाबी टी१० (Abu Dhabi T10 League 2021) क्रिकेट लीगच्या चौथ्या एडिशनचे आयोजन गुरूवारी(२८ जानेवारी)पासून होत आहे. या लीगमध्ये जगातील दिग्गज खेळाडू खेळणार आहेत. आठ संघांच्या या स्पर्धेत एकूण २९ सामने खेळवले जातील. दोन्ही संघ १०-१० ओव्हर खेळतील. अखेरचा सामना ६ फेब्रुवारीला शेख जायेद स्टेडियममध्ये खेळवला जाईल. 

जाणून घ्या ५ खेळाडूंवर असणार नजर

ख्रिस गेल(ch

वेस्ट इंडिजचा स्फोटक गोलंदाज ख्रिस गेल या टी १० लीगमध्ये अबू धाबी संघाकडून खेळताना दिसणार आहे. गेलने गेल्या सीझनमध्ये आयपीएल २०२०मध्ये चांगले प्रदर्शन केले होते. त्याने ७ सामन्यात २८८ धावा केल्या होत्या यात ३ अर्धशतकाचा समावेश होता. अशातच या टी१०मध्ये त्याच्या कामगिरीवर नजर असेल. गेलच्या नावावर टी-२०मध्ये १००१ षटकार आहेत.गेलने या लीगमध्ये खेळण्याबाबत आपल्या विरोधी संघांना आधीच आव्हान दिले आहे. 

ड्वायेन ब्राव्हो

मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा वेस्ट इंडिजचा अनुभवी क्रिकेटर ड्वायेन ब्राव्होसाठी गेल्या आयपीएलचा सीझन तितकासा चांगला ठरला नाही.त्याला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. मात्र या टी१० लीगमध्ये ब्राव्हो पूर्ण तयारिनिशी उतरणार आहे. तो दिल्ली बुल्स या संघाकडून खेळणार आहे. ३७ वर्षीय ब्राव्हो या स्पर्धेत आपल्या ऑलराऊंडर खेळाने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल यात शंकाच नाही. ब्राव्होने टी-२० करिअरमध्ये एकूण ३०२ षटकार ठोकले आहेत. 

शाहीद आफ्रीदी

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद अफ्रीदी या टी-१० लीगमध्ये कलंदर्स टीमकडून खेळताना दिसणार आहे. अफ्रीदीकडे ३००हून अधिक टी-२० सामन्यांचा अनुभव आहे. सडेतोड फलंदाजी आणि आपल्या लेग स्पिन गोलंदाजीच्या जोरावर आफ्रीदी विरोधी संघाला नामोहरम करू शकतो. ४० वर्षीय आफ्रीदीने ३२२ टी२० सामन्ात २५०हून अधिक षटकार ठोकले आहेत. 

सुनील नारायण

विस्फोटक फलंदाजीमध्ये प्रसिद्ध असलेल्या सुनील नारायण हा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील एक चांगला खेळाडू आहे. या टी१० लीगमध्ये तो डेक्कन ग्लेडिएटर्स(Deccan Gladiators) कडून खेळणार आहे. जर तो जबरदस्त फॉर्ममध्ये असेल तर त्याच्याविरोधात धावा करणे कठीण होऊन जाईल. 

प्रवीण तांबे

स्पर्धेत भारताकडून प्रवीण तांबे(Pravin tambe)खेळताना दिसणार आहे. स्पिनर प्रवीण तांबे चॅम्पियन मराठा अरेबियन्स(Maratha Arabians) कडून खेळताना दिसणार आहे. टी१० क्रिकेटमध्ये ४९ वर्षीय प्रवीणच्या नावावर हॅटट्रिक आहे. आता या लीगमध्ये ते कशी कामगिरी करतात हे पाहावे लागेल. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी