Super Smash League: न्यूझीलंडच्या फलंदाजाच्या २२ चेंडूत ११० धावा; बाबर आझमला मागे टाकत केला विश्वविक्रम

क्रीडा / क्रिकेटकिडा
Updated Jan 09, 2022 | 15:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Michael Bracewell Innings | न्यूझीलंडच्या घरच्या टी-२० लीग सुपर स्मॅश स्पर्धेत असे काही घडले ज्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला चकित केले आहे. दरम्यान टी-२० लीग सुपर स्मॅश लीगमध्ये वेलिंग्टन फायरबर्ड्स संघाचा कर्णधार मायकेल ब्रेसवेलने त्याच्या फलंदाजीने गोलंदाजांना चांगलेच चितपट केले.

  T20 Cricket Super Smash League Michael Bracewell did only 22 balls 110 runs overtake babar azam and made world record
न्यूझीलंडच्या फलंदाजाने केल्या २२ चेंडूत ११० धावा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • न्यूझीलंडच्या घरच्या टी-२० लीग सुपर स्मॅश स्पर्धेत असे काही घडले ज्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला चकित केले आहे.
  • शनिवारी झालेल्या सेंट्रल डिस्ट्रिक विरूध्दच्या सामन्यात मायकेल ब्रेसवेलने ६५ चेंडूत नाबाद १४१ धावांची आक्रमक खेळी केली.
  • ब्रेसवेलने १४१ धावांची नाबाद खेळी करत एक खास विक्रम केला. आता मायकेल ब्रेसवेल हा टी-२० क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी खेळणारा पहिला फलंदाज बनला आहे. अशी कामगिरी करत त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा विक्रम मोडला आहे.

T20 Cricket | नवी दिल्ली : न्यूझीलंडच्या घरच्या टी-२० लीग सुपर स्मॅश (Super Smash League ) स्पर्धेत असे काही घडले ज्याने संपूर्ण क्रिकेट विश्वाला चकित केले आहे. दरम्यान टी-२० लीग सुपर स्मॅश लीगमध्ये वेलिंग्टन फायरबर्ड्स (Firebirds) संघाचा कर्णधार (Captain) मायकेल ब्रेसवेलने (Michael Bracewell) त्याच्या फलंदाजीने गोलंदाजांना चांगलेच चितपट केले. ( T20 Cricket Super Smash League Michael Bracewell did only 22 balls 110 runs overtake babar azam and made world record)

शनिवारी झालेल्या सेंट्रल डिस्ट्रिक (Central Districts) विरूध्दच्या सामन्यात मायकेल ब्रेसवेलने ६५ चेंडूत नाबाद १४१ धावांची आक्रमक खेळी केली. त्याने त्याच्या या आक्रमक खेळीत एकूण ११ षटकार आणि ११ चौकार लगावले. लक्षणीय बाब म्हणजे ब्रेसवेलच्या या धमाकेदार खेळीच्या जोरावर फायरबर्ड्सच्या संघाला सामन्यात विजय मिळवण्यात यश आले. दरम्यान सेंट्रल डिस्ट्रिकच्या संघाने २० षटकांत २२० धावांची विशाल धावसंख्या उभारली होती. या विशाल आव्हांनाचा पाठलाग करताना फायरबर्ड्सच्या संघाचे केवळ ४३ धावांवर ५ गडी बाद झाले होते.

मात्र यानंतर ब्रेसवेलने शानदार फलंदाजी केली आणि संघाला एक चेंडू बाकी असताना विजय मिळवून दिला. फायरबर्ड्सच्या संघाने हा सामना २ गडी राखून आपल्या नावे केला. ब्रेसवेलने केवळ ४६ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. (T20 Cricket Super Smash League Michael Bracewell did only 22 balls 110 runs overtake babar azam and made world record). 

२२ चेंडूत ११० धावा   

दरम्यान, ब्रेसवेलने त्याच्या खेळीत ११ चौकार आणि ११ षटकार मारले. म्हणजेच त्याने आपल्या खेळीत २२ चेंडूत फक्त बाउंड्रीवरून ११० धावा केल्या ज्यामध्ये चौकारातून ४४ आणि षटकारांमधून ६६ धावा केल्या. सोशल मीडियावर ब्रेसवेलच्या खेळीवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. 

https://twitter.com/kaustats/status/1479670697706201089?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1479670697706201089%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fndtv.in%2Fcricket%2Fcricket-record-breaking-michael-bracewell-century-sees-wellington-pull-off-super-smash-heist-against-central-districts-hindi-2696884

बाबर आझमचा (Babar Azam) विक्रम मोडला

ब्रेसवेलने १४१ धावांची नाबाद खेळी करत एक खास विक्रम केला. आता मायकेल ब्रेसवेल हा टी-२० क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार म्हणून सर्वात मोठी खेळी खेळणारा पहिला फलंदाज बनला आहे. अशी कामगिरी करत त्याने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा विक्रम मोडला आहे. 

२०२१ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यात आव्हानाचा पाठलाग करताना बाबरने १२२ धावांची खेळी केली होती. याशिवाय ब्रेसवेलने खेळलेली १४१ धावांची खेळी धावांचा पाठलाग करताना खेळलेली तिसरी सर्वोच्च खेळी ठरली आहे. याआधी २०१४ मध्ये ल्यूक राइटने धावांचा पाठलाग करताना नाबाद १५३ धावा केल्या होत्या. याशिवाय २०१५ मध्ये ख्रिस गेलनेही टी-२० मध्ये आव्हानाचा पाठलाग करताना १५१ धावांची नाबाद धडाकेबाज खेळी खेळली होती.

टी-२० मध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजाने खेळलेली तिसरी सर्वोच्च खेळी

मायकेल ब्रेसवेलने खेळलेली १४१ धावांची खेळी ही न्यूझीलंडच्या खेळाडूने टी-२० मध्ये खेळलेली तिसरी सर्वोच्च खेळी ठरली आहे. आयपीएल २००८ मध्ये आरसीबी विरुद्ध केकेआरकडून खेळताना बँडन मॅक्युलमने ७३ चेंडूत १५८ धावा केल्या होत्या. तर २०१५ मध्ये टी-२० ब्लास्टमध्ये मॅक्युलमने ६४ चेंडूत १५८ धावा केल्या होत्या.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी