T20 WC Memes Viral on social Media: उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव होताच सोशल मीडियावर आला मीम्सचा पाऊस

T20 WC Memes Viral on social Media: यंदाची टी २० वर्ल्डकप स्पर्धा (T20 World Cup) भारतीय संघासाठी निराशाजनक राहिली. या स्पर्धेत पाकिस्तान संघाने (Pakistan Team) जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली.

After Pakistan's defeat in the semi-finals, memes came on social media
पाकिस्तानचा पराभव होताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • उपांत्य फेरीत पाकिस्तानने दिलेल्या १७७ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने १९ षटकातच पूर्ण केलं.
  • ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून पाकिस्तानचा पराभव केला.
  • ऑस्ट्रेलिया आता १४ नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.

T20 WC Memes Viral on social Media: नवी दिल्ली : यंदाची टी २० वर्ल्डकप स्पर्धा (T20 World Cup) भारतीय संघासाठी निराशाजनक राहिली. या स्पर्धेत पाकिस्तान संघाने (Pakistan Team) जबरदस्त कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. अंतिम फेरीत धडक मारून टी२०चा विश्वचषक आपल्या नावावर करेल अशी आशा अनेकांना होती. परंतु उपांत्य फेरीच्या (Semi-finals) दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia) पाकिस्तानचा पराभव करत सर्व स्वप्नांवर पाणी फेरले. उपांत्य फेरीत पाकिस्तानने दिलेल्या १७७ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने १९ षटकातच पूर्ण केलं. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या अटीतटीच्या सामन्यात मॅथ्यू वेड आणि मार्कस स्टॉइनिसने पाकिस्तानच्या तोंडचा विजयी घास हिरावत ऑस्ट्रेलियाला ५ गडी राखून विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत पोहोचला आहे. 

पाकिस्तानचे दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. पाकिस्तान भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनीही जल्लोष केल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळाले. उपांत्य फेरीत पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडू लागला आहे. 

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने सुसाट पाकिस्तानचा विजयीरथ रोखत अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑस्ट्रेलियाचा कप्तान आरोन फिंचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने कोणताही दबाव न घेता २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांची उत्तम सुरुवात, तर सूर गवसलेल्या फखर जमानच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाच्या संघाची चिंता वाढवली.

रिझवानने ६७ तर जमानने नाबाद ५५ धावा कुटल्या. पाकिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या  ऑस्ट्रेलियाची फलंदाजी थोडी खराब स्थिती राहिली. कंगारुचे फिंच, स्मिथ आणि मॅक्सवेलला स्वस्तात बाद झाले. पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९व्या षटकात विजय मिळवला.

१९व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाऱ्या वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. आता या स्पर्धेला नवा विश्वविजेता मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया आता १४ नोव्हेंबरला विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडशी भिडणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी