T20 WC IND vs PAK : आज सर्वाधिक रोमांचक सामना; भारत-पाकिस्तानचा संघ आज आमने-सामने, कोणत्या प्रेक्षकांना मिळेल नाचण्याचा 'मौका'

आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यंदाचा टी-२० विश्वचषक जिंकून पाकिस्तानविरुद्धही विजय मिळवण्यासाठी भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे.

T20 WC IND vs PAK
T20 WC IND vs PAK :भारत-पाकिस्तानचा संघ आमने-सामने  |  फोटो सौजन्य: Twitter
थोडं पण कामाचं
  • हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून खेळला जाईल.
  • टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचे पारडे जड आहे.
  • टी 20 हे असे स्वरूप आहे ज्यात कोणत्याही संघाचा विजय निश्चित मानला जाऊ शकत नाही.

दुबई : आज पाकिस्तानविरोधातील सामन्यापासून भारतीय संघाच्या टी-20 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यंदाचा टी-२० विश्वचषक जिंकून पाकिस्तानविरुद्धही विजय मिळवण्यासाठी भारत प्रबळ दावेदार मानला जात आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सायंकाळी साडेसात वाजल्यापासून खेळला जाईल. दरम्यान पाकिस्तान संघाने आपल्या अंतिम १२ खेळाडूची घोषणा करत विराट कोहली अन् कंपनीला धक्का दिला. भारतीय संघाच्या अंतिम ११ खेळाडूबाबत अद्याप संभ्रम असल्याचे दिसत आहे.

 टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्ताविरोधात भारतीय संघाचे पारडे जड आहे.  भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यानचा सामना अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कोणत्याह टुनॉमेंटमध्ये आकर्षकचा केंद्र ठरत असतो. कारण दोन्ही देशांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळते. आयसीसी टुनॉमेंटमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट संघ जेव्हा आमने-सामने येत असतात, तेव्हा प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह असतो. आयसीसीचा आतापर्यंत झालेल्या एकदिवशीय सामने आणि टी २० विश्वचषकाचा इतिहास पाहिला, तर भारत आणि पाकिस्तानमध्ये १२ सामने झाले आहेत. या सर्व सामने भारताने जिंकले आहेत. या सामन्यांच्या नाणेफेकीमध्ये भारताने ८ वेळा नाणेफेक जिंकली आहे.

प्रथम फलंदाजी करताना भारताने सात सामान्यामध्ये विजय मिळवला तर काही सामने (टाय) अनिर्णित राहिले आहेत. 2007 मध्ये टी-20 विश्वचषक सुरू झाल्यापासून भारतीय संघाने पाचही सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभूत केले आहे आणि विराट कोहलीचा संघ ही विजयी मोहीम सुरू ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. पण दिग्गजांना, असा विश्वास आहे की टी 20 हे असे स्वरूप आहे जेथे एकही खेळाडू विशिष्ट दिवशी खेळ फिरवू शकतो. खेळाडू म्हणू शकतात की त्यांच्यासाठी हा सामना इतर कोणत्याही सामन्यासारखा आहे, परंतु प्रेक्षकांसाठी हा सामना उच्च व्होल्टेज बनत असतो. 

या सामन्याची सर्वांना आतुरता 

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने T20 विश्वचषकातील सर्व सामने जिंकले. निवृत्ती घेतल्यानंतर धोनी कोहलीला मार्गदर्शक म्हणून उपस्थित असल्याने संघाला धोनीची कमतरता दिसणार नाही. यामुळे धोनीची उपस्थिती बाबर आझम आणि त्याच्या सहकाऱ्यांची डोकेदुखी वाढवण्यासाठी पुरेशी आहे. हाच एक सामना आहे ज्याची प्रत्येकजण वाट पाहत असतो.

आयसीसीपासून ते प्रसारकांपर्यंत सर्वजण या सामन्यातून मोठी कमाई करण्यावर लक्ष केंद्रित करत असतात, तर चाहत्यांच्या भावना त्याच्याशी जोडल्या जातात. पण टी 20 हे असे स्वरूप आहे ज्यात कोणत्याही संघाचा विजय निश्चित मानला जाऊ शकत नाही. सुनील गावस्कर असो किंवा सौरव गांगुली, जो कोणी हा खेळ खूप चांगल्या प्रकारे समजतो त्याला समजते की या फॉरमॅटमध्ये दोन संघांमधील फरक खूप कमी आहे आणि कोणताही एक खेळाडू आपल्या संघाला विजयाकडे नेऊ शकतो.

चुकीला माफी नाही  

कोहलीही या सामन्यातून फॉर्ममध्ये परतण्याचा निर्धार करेल. तो शाहीन शाह आफ्रिदी देखील असू शकतो जो भारतीय टॉप ऑर्डरवर वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करेल. हा खेळाडू मोहम्मद रिझवान किंवा मोहम्मद शमी किंवा सूर्यकुमार यादव असू शकतो. खेळाडू कदाचित म्हणत असतील की हा त्यांच्यासाठी दुसऱ्या सामन्यासारखा आहे परंतु त्यांना हे देखील चांगले माहित आहे की त्यांची खराब कामगिरी त्यांना वर्षानुवर्षे त्रास देऊ शकते.

निवड समितीचे विद्यमान अध्यक्ष चेतन शर्मा यांच्यापेक्षा हे अधिक चांगले कोणाला माहीत आहे, ज्यांचा शेवटचा चेंडू 35 वर्षांपूर्वी जावेद मियादने विजयी षटकार मारला होता. पण तेव्हापासून ते आतापर्यंत क्रिकेटमध्ये खूप बदल झाला आहे आणि आता भारत क्रिकेटमधील सर्वात मजबूत शक्ती बनला आहे ज्यात अनेक चांगले खेळाडू आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह सारखे क्रिकेटपटू कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली येणाऱ्या खेळाडूंमध्ये नाहीत.

पाकिस्तानवर अधिक दबाव असेल

टी-२० वर्ल्ड कपबद्दल बोलायचे झाले तर पाकिस्तानविरुद्ध भारताचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. टी २० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत ५ सामने झाले आहेत, त्यापैकी टीम इंडियाने सर्व पाच सामने जिंकले आहेत. २०१६ च्या विश्वचषकात टीम इंडियाने पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ५ गड्यांच्या मोबदल्यात ११८ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने ४ गडी गमावून लक्ष्य गाठले.
दरम्यान पाकिस्तान क्रिकेट गेल्या काही वर्षांपासून अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे आणि अशा परिस्थितीत भारताविरुद्धचा सामना त्यात थोडी आशा आणेल पण ते सोपे नसेल. यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळून भारतीय खेळाडूंना या येथील मैदानाचा अंदाज आला आहे. तर  पाकिस्तान संघ येथे त्यांची देशातील मालिका खेळत असतो.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी