T20 World Cup 2021 IND Vs NZ : आजचा सामना 'करा किंवा मरा'; विलियम्सनची फलंदाजी,सोढी अन् बोल्टची गोलंदाजी टीम इंडियासाठी ठरू शकते डोकेदु:खी

T20 World Cup 2021 IND Vs NZ : सलामीच्या पराभवाने अडचणीत सापडलेले भारत (India) आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ(New Zealand Cricket Team) आज रविवारी आयसीसी टी-२० विश्वचषकातील (ICC T20 World Cup) आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी शर्थीची झुंज देतील.

T20 World Cup 2021 IND Vs NZ :
न्यूझीलंडचे हे तीन खेळाडू टीम इंडियासाठी आहेत धोकेदायक  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आजच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघासाठी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील वाट अधिक खडतर.
  • भारत आणि न्यूझीलंडचा पाकिस्तान संघाने पहिल्याच सामन्यात पराभव केला.
  • भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 16 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत.

T20 World Cup 2021 IND Vs NZ : नवी दिल्ली : सलामीच्या पराभवाने अडचणीत सापडलेले भारत (India) आणि न्यूझीलंड क्रिकेट संघ(New Zealand Cricket Team) आज रविवारी आयसीसी टी-२० विश्वचषकातील (ICC T20 World Cup) आपले आव्हान कायम ठेवण्यासाठी शर्थीची झुंज देतील. दुबईच्या (Dubai) मैदानावर संध्याकाळी साडेसात वाजात भारत आणि न्यूझीलंड (India and New Zealand) यांच्यात सामना (Match) रंगणार आहे. या दोन्ही संघांसाठी हा सामना ‘करा वा मरा’सारखा आहे, कारण दोन्ही संघांनी आपला पहिला सामना एकाच प्रतिस्पर्धी पराभूत झाले आहेत. पाकिस्तानच्या संघाने दोन्ही संघांना पराभूत करत उपांत्य फेरीतील आपलं तिकीट पक्क केलं आहे. दरम्यान आजच्या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघासाठी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील वाट अधिक खडतर राहणार आहे. त्यामुळे २००७ चा विश्वविजेता भारतीय संघ आव्हान कायम ठेवण्याच्या इराद्याने मैदानावर उतरेल. मात्र, विजयाच्या मार्गत तीन मोठे अडसर आहेत. यावर मात करून भारतीय संघाला सामन्यात विजयी पताका फडकवता येईल. 

दोन्ही संघामध्ये कडवी झुंज 

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एकूण 16 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत आणि एकूण आकडेवारीमध्ये जबरदस्त टक्कर दिसत आहे. भारत आणि न्यूझीलंडने 8-8 सामन्यात विजयाचा झेंडा फडकावला आहे. त्याचवेळी, दोन्ही संघांमधील गेल्या पाच सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने वर्चस्व राखले आहे आणि सर्व सामने जिंकले आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 मध्ये शेवटची भेट 2020 मध्ये झाली होती. त्यानंतर भारताने पाच सामन्यांच्या T20I मालिकेत न्यूझीलंडचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत, रविवारी जेव्हा हे दोघे आमनेसामने असतील, तेव्हा टी-20 फॉरमॅटमध्ये किवी संघाविरुद्धची विजयी मालिका कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. परंतु न्यूझीलंडच्या संघातील तीन खेळाडुंमुळे टीम इंडियाची चिंता वाढू शकते. 

सोढीचे भारताविरुद्ध १२ मॅचमध्ये १७ बळी

- लेग स्पिनर इश सोढीने वनडेत कोहलीला विक्रमी ५ व राहुलला दोन वेळा बाद केले. रोहितलाही या गोलंदाजाविरुद्ध चांगली खेळी करण्यात आली नाही.
- सोढीने आतापर्यंत भारतविरुद्ध १२ सामन्यात १७ बळी घेतले. गत २ सामन्यात पाच विकेट घेतल्या.

बोल्टकडून भारताच्या दिग्गजांना धक्का

- कोहली, रोहित व राहुल डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध सपशेल अपयशी आहेत. हे गत सामन्यात पाकच्या शाहिन आफ्रिदीने जगजाहीर केले. लेफ्ट आर्म पेसर बोल्टने कोहलीला विक्रमी ६, रोहितला ५ व राहुलला एक वेळा बाद केले आहे.

विलियम्सनचे फलंदाजीत मोठे आव्हान

- भारताविरुद्ध ११ सामन्यात ३२५ च्या स्ट्राइक रेटने ३२५ धावा. यापेक्षा अधिक धावा त्याने फक्त पाकविरुद्ध केल्या आहेत. त्याची टी-२० मध्ये सर्वोत्तम ९५ धावांची खेळीही भारताविरुद्ध सामन्यातूनच झाली आहे.

  • २००३ पासून किवीजवर भारताला विजय नाही. 
  •  टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही देश २००७ आणि २०१६ मध्ये भिडले. दोन्ही वेळा न्यूझीलंड जिंकला.
  • २००३ नंतर भारत आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध एकदाही जिंकू शकलेला नाही.
  • २०१९ वन डे वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत भारत न्यूझीलंडकडून पराभूत होऊन बाद ठरला होता.
  • न्यूझीलंडने भारताला हरवून कसोटी चॅम्पियनशिप-२०२१ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी-२००० जिंकली.
  • २०२० मध्ये भारताने न्यूझीलंडला हरवून टी-२० मालिका जिंकली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी