T20 World Cup 2021: पाकड्यांनी भारताचं नाव जर्सीवरून हटवलं, टाकलं हे नाव

पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडे राहणार याचे आणखी एक उदाहरण क्रिकेट टी-२० वर्ल्ड कपपूर्वी समोर आले आहे.  पाकिस्तानातून दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा आणि रसद यामुळे भारतानं त्यांच्याशी सर्व संबंध तोडले आहेत.  

t20 world cup 2021 pakistan write uae 2021 instead of india 2021 on their jersey despite india being the hosts
T20 World Cup 2021: पाकड्यांना भारताचं नाव जर्सीवरून हटवलं 

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडे राहणार याचे आणखी एक उदाहरण क्रिकेट टी-२० वर्ल्ड कपपूर्वी समोर आले आहे.  
  • पाकिस्तानातून दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा आणि रसद यामुळे भारतानं त्यांच्याशी सर्व संबंध तोडले आहेत.  
  • भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे बंद केले आहे.

इस्लामाबाद : पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडे राहणार याचे आणखी एक उदाहरण क्रिकेट टी-२० वर्ल्ड कपपूर्वी समोर आले आहे.  पाकिस्तानातून दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा आणि रसद यामुळे भारतानं त्यांच्याशी सर्व संबंध तोडले आहेत.  त्यामुळेच भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे बंद केले आहे. मात्र, आता आयसीसी स्पर्धांमध्ये नाईलाजानं भारताला  पाकिस्तानी संघाविरुद्ध खेळावे लागत आहे. (t20 world cup 2021 pakistan write uae 2021 instead of india 2021 on their jersey despite india being the hosts)


आता २४ ऑक्टोबरला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. पण, या लढतीपूर्वीच पाकिस्तानी संघाला 'India' या नावाचा प्रॉब्लेम झाल्याचे दिसून आले आहे. आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या जर्सीवरून पाकिस्तान संघानं भारताचं नावच काढून टाकल्याला धक्कादायक प्रकार घडला आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam T20 World Cup Jersey) यानं घातलेली वर्ल्ड कप जर्सीच्या फोटोतून ही बाब समोर आली आहे.

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे, परंतु कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा ओमान व यूएई येथे बीसीसीआयच्या यजमानपदाखालीच खेळवली जात आहे. १७ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आणि पाकिस्तान स्पर्धेतील पहिला सामना टीम भारताविरुद्धच खेळणार आहे. या स्पर्धेसाठी पाकिस्तानने तयार केलेल्या जर्सीवर India 2021 ऐवजी UAE 2021 असे लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे नेदरलँड्स, ओमान, ऑस्ट्रेलिया यांच्यासह सर्व देशांच्या जर्सीवर भारताचेच नाव आहे. त्यामुळे आता पाकिस्तान त्यांच्या जर्सीवरील ही चूक सुधारते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

T20 SCOTLAND

पाकिस्तानचा वर्ल्ड कप संघ - बाबर आझम, आसीफ अली, खुशदील शाह, मोहम्मद हाफिज, सोहैब मक्सूद, आझम खान, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, मोहम्मद हस्नैन, शाहिन शाह आफ्रिदी
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी